मारुती सुझुकीच्या ऑफ रोड कारची झलक सादर, अपकमिंग 2022 Jimny लाँचिंगसाठी सज्ज

मारुती सुझुकीने नेक्साच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या बहुप्रतिक्षित कारचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर आगामी जिम्नी एसयूव्हीचा आहे.

मारुती सुझुकीच्या ऑफ रोड कारची झलक सादर, अपकमिंग 2022 Jimny लाँचिंगसाठी सज्ज
Maruti Suzuki Jimny
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 5:03 PM

मुंबई : मारुती सुझुकीने नेक्साच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या बहुप्रतिक्षित कारचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर आगामी जिम्नी एसयूव्हीचा आहे. टीझरसोबत कंपनीने विचारलं आहे की, ही कोणती कार आहे ते ओळखा. (Maruti Suzuki teases new off road car, it will be upcoming 2022 Jimny)

टीझरमध्ये ऑफ-रोड/डेझर्ट ट्रेलवर कारच्या टायरच्या खुणा दाखवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, ही कार आगामी जिम्नी एसयूव्हीच असू शकते. कंपनी त्यांच्या मानेसर, हरियाणा प्लांटमध्ये एसयूव्हीचे 3-डोर व्हर्जन तयार करत आहे. तिथून या गाड्या जागतिक बाजारात निर्यात केल्या जातात. दरम्यान, भारतात आता जिम्नीचे 5-डोर व्हर्जन लाँच होण्याची अपेक्षा आहे, जी सध्या विकसित होत आहे.

भारतात महिंद्राने आपली न्यू जनरेशन थार एसयूव्ही आधीच लॉन्च केली आहे. न्यू जनरेशन गुरखादेखील नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. मारुतीची आगामी जिमनी एसयूव्ही दोन्ही ऑफ-रोडर्सना थेट स्पर्धा देईल. मारुती सुझुकी जिम्नीची नवीन इंडिया-स्पेक 5-डोर LWB आवृत्ती 2022 मध्ये देशात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.

दमदार इंजिन

इंटरनॅशनल-स्पेक जिम्नी 1.4 लीटर माइल्ड-हायब्रिड टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येते, तथापि, भारतासाठी, 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन यात वापरले जाऊ शकते. हेच इंजिन मारुतीच्या विद्यमान Vitara Brezza, Ciaz, Ertiga आणि XL6 कारमध्येही उपलब्ध आहे. हे इंजिन 6000rpm वर 103bhp मॅक्सिमम पॉवर तसेच 4400rpm वर 138Nm पीक टॉर्क निर्माण करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येईल आणि पर्यायी 4 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन देखील देऊ शकेल.

View this post on Instagram

A post shared by NEXA (@nexaexperience)

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Maruti Suzuki teases new off road car, it will be upcoming 2022 Jimny)

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.