Maruti Suzuki : मारूतीच्या या तीन कारने ग्राहकांना केले निराश, किंमत कमी, मायलेजही चांगला पण विक्री नाही
Maruti Suzuki मारूती ही अनेक ग्राहकांची पहिली पसंती आहे, मात्र कंपनीच्या काही मॉडेलला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये कोणत्या कारचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही भारतातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे आणि दरमहा लाखो वाहनांची विक्री करते. जून महिन्यात मारुती सुझुकीच्या वॅगनआर आणि स्विफ्ट या दोन कारचा देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीच्या Baleno, Brezza आणि Eeco सारख्या गाड्याही चांगली विकल्या जातात. पण मारुती सुझुकीची 3 वाहने आहेत ज्यांची विक्री खूपच कमी आहे आणि ही कंपनीची सर्वात कमी विक्री होणारी वाहने आहेत.
या मॉडेलला मिळाला कमी रिस्पॉन्स
मारुती सियाझ पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक प्रीमियम सेडान कार आहे, ज्याची जून महिन्यात केवळ 1,744 युनिट्सची विक्री झाली. Maruti Ciaz ची किंमत 9.30 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.45 लाख रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला 4.2 इंच TFT MID, रियर एसी व्हेंट्स, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्ट यांसारखी लक्झरी वैशिष्ट्ये देखील मिळतात. सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि स्पीड अलर्ट सिस्टीम सोबतच ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर देखील उपलब्ध आहेत.
मारुती एस-प्रेसो दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने जून महिन्यात 2,731 युनिट्सची विक्री केली. मारुती एस्प्रेसोची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.12 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती सेलेरियो तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने जून महिन्यात केवळ 3,599 युनिट्सची विक्री केली. मारुती सेलेरियोची किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.14 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार आहे. ती पेट्रोलमध्ये 26kmpl पर्यंत आणि CNG मध्ये 35KM पर्यंत मायलेजचा दावा करते.