पुढील महिन्यापासून ‘या’ कंपनीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या कारण

मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी पुन्हा एकदा आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील महिन्यापासून मारुती कारच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यापासून 'या' कंपनीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या कारण
Maruti Dzire
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 8:03 AM

मुंबई : मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी पुन्हा एकदा आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील महिन्यापासून मारुती कारच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे कारण कार निर्मात्या कंपनीने पुष्टी केली आहे की, ते पुन्हा एकदा किंमती वाढवणार आहेत. त्याचबरोबर, यावर्षी जानेवारीनंतर ही तिसरी वेळ आहे जेव्हा कंपनी किंमती वाढवणार आहे. अल्टो ते विटारा ब्रेझा पर्यंत मारुतीच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचे नियोजन आहे. (Maruti Suzuki to increase car prices in India in September 2021)

आज जारी केलेल्या निवेदनात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात विविध इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर परिणाम होत आहे. म्हणून, किंमती वाढीद्वारे अतिरिक्त खर्चाचा काही भाग ग्राहकांसोबत शेअर करणे आवश्यक झाले आहे.

या वर्षात तिसऱ्यांदा किंमतीत वाढ

येत्या सणासुदीच्या आधी सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. मात्र ही दरवाढ किती मोठी असेल हे मारुतीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. यापूर्वी मारुतीने आपल्या कारच्या किंमती दोनदा वाढवल्या होत्या. जानेवारी महिन्यात मारुतीने काही मॉडेल्सच्या किंमती 34,000 रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या, कारण इनपुट खर्चात वाढ झाली होती. एप्रिलमध्ये, जेव्हा दुसरी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्यांच्या कारच्या किमती सुमारे 1.6 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या.

मारुती सुझुकी एकमेव भारतीय कार उत्पादक कंपनी नाही जिने वाढत्या इनपुट खर्चामुळे आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. भारतीय वाहन उद्योग गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे रुळावरुन घसरला आहे. मागणी कमी झाली आहे. त्याउलट इनपुट खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून, ऑटो कंपन्यांनी मागणीत परतावा पाहिला आहे, परंतु पुढील अनिश्चिततेबद्दल इशारादेखील दिला आहे. वाढत्या खर्चासह अनेक कार निर्मात्यांनी यावर्षी किमतीही वाढवल्या आहेत.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Maruti Suzuki to increase car prices in India in September 2021)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.