मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार Tata Punch EV ला टक्कर देणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास?

मारुती सुझुकी कारची (Maruti Suzuki Car) लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि आता कंपनी एक नवीन छोटी कार तयार करत आहे, जी एक छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही कार असेल. या कारचे सांकेतिक नाव (कोडनेम) मारुती सुझुकी YY8 (Maruti Suzuki YY8) असे आहे.

मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार Tata Punch EV ला टक्कर देणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास?
Tata Punch Car
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 4:00 PM

मुंबई : मारुती सुझुकी कारची (Maruti Suzuki Car) लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि आता कंपनी एक नवीन छोटी कार तयार करत आहे, जी एक छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही कार असेल. या कारचे सांकेतिक नाव (कोडनेम) मारुती सुझुकी YY8 (Maruti Suzuki YY8) असे आहे. या कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, या कारची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षी टाटा मोटर्सने पंच (Tata Punch) ही त्यांची लहान एसयूव्ही या सेगमेंटमध्ये सादर केली होती आणि आता अनेक लीक्स रिपोर्ट्समधून समोर आले आहे की कंपनी पंचचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील तयार करत आहे.

इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती ब्रँडची ही कार शून्य उत्सर्जनावर (झिरो एमीशन) काम करेल. या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला असून या कारचे सांकेतिक नाव YY8 आहे. या कारची बॉडी एसयूव्ही प्रकारातील असेल. या कारची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी ही टाटा मोटर्सची पंच कॉम्मॅक्ट ईलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

वॅगनआर इलेक्ट्रिकची रोड टेस्टिंग

दरम्यान, भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीने WagonR इलेक्ट्रिकची रोड टेस्टिंग केली आहे. त्याचा प्रोटोटाइप 2018 मध्ये तयार करण्यात आला आहे, मात्र तो कधी लॉन्च केला जाईल याबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात

टाटा मोटर्सने याआधीच आपल्या अनेक परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. यामध्ये Tata Tigor EV ही Tata Nexon EV या दोन गाड्या कंपनीने आधीच बाजारात सादर केल्या आहेत. या गाड्या भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. याशिवाय टाटा मोटर्स ही कंपनी या वर्षात टाटा टियागो ईव्ही, टाटा पंच ईव्ही आणि टाटा अल्ट्रॉझ ईव्ही सादर करू शकते.

मारुतीच्या ईव्हीचा लूक टोयोटाच्या ईव्हीप्रमाणे असू शकतो

मारुती सुझुकी YY8 microSUV कार इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केली जाऊ शकते. ही कार टोयोटाच्या बीईव्हीसारखी दिसू शकते, जी तैवानच्या बाजारात उपलब्ध आहे. मारुतीची ही कार पाच सीटर असेल. तथापि, या कारचे उत्पादन गुजरातमधील प्लांटमध्ये होऊ शकते आणि ते 2024 च्या आसपास सादर केले जाऊ शकते. मात्र, कंपनीकडून या माहितीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

तर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...