ड्रीम कार : जुनी मर्सिडिज खरेदीवेळी तपासा ‘या’ गोष्टी, लाखोंचा भुर्दंड टाळा

तुम्ही अर्ध्या किंमतीत सेकंड हँड मर्सिडिजचं (Mercedes car) स्वप्न पूर्ण करू शकतात. कार खरेदी करताना तुम्हाला माहित हवं. कारचं मेंटेनन्स आणि पार्टस् देखील अधिक महाग असतात. त्यामुळे मर्सिडिज कार खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायलाच हव्या.

ड्रीम कार : जुनी मर्सिडिज खरेदीवेळी तपासा ‘या’ गोष्टी, लाखोंचा भुर्दंड टाळा
Mercedes CarsImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:43 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या मनात स्वत:च्या ड्रीम कारचं (Dream Car) स्वप्न असतं. आपल्या दारात मर्सिडिज सारखी लक्झरी कार असावी यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्रीमियम कारच्या (Premium car) किंमतींचा आकड्यामुळं बजेट कोलमडू शकतं. मात्र, सेकंड हँड कारच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकतात. मार्केट मध्ये नव्या मर्सिडिज सी-क्लास एक्स-शोरुमची किंमत 55 लाखांपासून सुरू होते. तुम्ही अर्ध्या किंमतीत सेकंड हँड मर्सिडिजचं (Mercedes car) स्वप्न पूर्ण करू शकतात. कार खरेदी करताना तुम्हाला माहित हवं. कारचं मेंटेनन्स आणि पार्टस् देखील अधिक महाग असतात. त्यामुळे मर्सिडिज कार खरेदी करताना तुम्ही काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायलाच हव्या.

मेकॅनिकचा हवा सल्ला

कार साधी असो वा लक्झरी. मात्र, गाडीची बारकाईने तपासणी करणं महत्वाच आहे. जुनी कार खरेदी करताना तज्ज्ञ मॅकेनिककडून कारची तपासणी करायला हवी. कारची यापूर्वीची सर्व्हिस हिस्ट्री व मेंटेनन्स बाबत पाहून घ्या. कार मालक कंपनीच्या सर्व्हिस सेंटरऐवजी स्थानिक दुकानदाराकडून कार रिपेअर करतात. यादरम्यान, तुम्ही कारचे वॉरंटी तपशीलही पडताळून पाहायलाच हवे.

मर्सिडिजचे ब्रेक

मर्सिडिज कारमध्ये असणारे दोष नादुरुस्तीच्या वेळेस समोर येतात. रिपोर्ट्स नुसार, ब्रेकबाबत नेहमीच तक्रारींचा पाढा वाचला जातो. जर कारने 20,000 किलोमीटरचं अंतर कापल असल्यास कारच्या ब्रेकमध्ये नक्कीच काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जुन्या मर्सिडिज कारचे ब्रेक नक्कीच तपासून पाहा.

मर्सिडिजचा अल्टरनेटर

ब्रेक बरोबरच मर्सिडिजचा अल्टरनेटर काही अंतराच्या टप्प्यानंतर नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक असते. मर्सिडिजने 40,000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला असल्यास अल्टरनेटर निश्चितच तपासून घ्या. तुम्हाला माहित हवं की, एका अल्टरनेटरची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असते. त्यामुळे खरेदीपूर्वी अल्टरनेटर तपासून घ्या. त्यामुळे खरेदीनंतर येणाऱ्या तुमच्या खर्चाला कात्री लागू शकते.

रिकॉल मर्सिडिज

मर्सिडिजने 2016-2018 मध्ये काही तांत्रिक कारणामुळे मर्सिडिज रिकॉल म्हणजेज मागे बोलवण्याचा निर्णय घेतला होता. या काळातील कारच्या स्टिअरिंग कॉलमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. तर काही कारमध्ये सीटबेल्ट प्रीटेंशनर खराब झाल्याचं निदर्शनास आलं होतं. तुम्ही या दोन टाईमलाईनदरम्यानच्या मॉडेलची खरेदी करणार असल्यास वरील दिलेल्या माहितीनुसार पडताळणी करायला विसरु नका.

कुठून खरेदी व कितीला?

जुनी मर्सिडिज कार खरेदीचं सर्वात चांगली संधी मर्सिडिजचा विक्री महोत्सव आहे. यामध्ये जुन्या वापरलेल्या गाड्यांची विक्री केली जाते. यासाठी तुमच्या खिश्याला अधिकचा भार पडेल. मात्र, तुम्हाला खात्रीशीर गाडी खरेदीनं चिंता मिटू शकेल. तुम्हाला डीलरद्वारे गाडी खरेदी करू शकतात. जुनी मर्सिडिज सी-क्लास साठी 25-27 लाख रुपयांची डील योग्य ठरू शकते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.