सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

MG मोटरने (MG Motors) अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, ही कार पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. (MG Cyberster)

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात
Mg Cyberstar
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 11:22 AM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (MG Cyberster Electric Roadster Could Go Into Production, car can run 800 kms on single charge)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, MG मोटरने एक कमालीची इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. एमजी सायबरस्टर (MG Cyberster) असे या कारचे नाव आहे, ही एक कॉन्सेप्ट कार आहे.

MG मोटरने (MG Motors) अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. एमजी सायबरस्टर (MG Cyberster) असे या कारचे नाव आहे, ही एक इलेक्ट्रिक रोडस्टर आहे. ही कॉन्सेप्ट कार कंपनीने एप्रिल 2021 मध्ये शांघाय मोटर शोमध्ये सादर केली होती. परंतु आता या कारची मूळ कंपनी अर्थात SAIC ने या कारच्या उत्पादनासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. क्राऊडफंडिंग कॅम्पेनमध्ये या कारला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे शक्य झाले आहे.

ब्रिटीश कार ब्रँडने स्वतः या कारच्या उत्पादनाची पुष्टी केलेली नाही, तर चीनी पॅरेंट ग्रुपने SAIC याबाबतची घोषणा केली आहे. कंपनीने या प्रकल्पासाठी क्राऊडफंडिंग कॅम्पेनची सुरुवात केली आहे. एमजी सायबरक्यूब प्लॅटफॉर्मच्या मदतीने हे केले गेले आहे, ज्या ग्राहकांना ही कार आवडेल, असे ग्राहक 156 डॉलर डोनेट करुन Cubersters ची पहिली बॅच घेऊ शकतात.

कारमध्ये काय आहे खास?

जर आपण या कॉन्सेप्ट कारबद्दल चर्चा केली तर तुम्हाला त्यात फ्ल्युड डिझाइन मिळेल. सायबरस्टरने शांघायमधील मॅजिक आय एलईडी हेडलाइट्सद्वारे जगासमोर याची ओळख करुन दिली. यात एक स्लिम ग्रिल डिझाइन देखील आहे जी आपल्याला 1960 च्या मूळ एमजीबी रोडस्टरची आठवण करून देते. कारचे एलॉय या कारला मजबूत लुक प्रदान करतात. या कारचं डिझाईन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कार्सपेक्षा वेगळं आहे.

सिंगल चार्जमध्ये 800 किमी धावणार

ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल 800 किमीपर्यंतचा प्रवास करेल, तर ताशी 0-100 किमी वेग धारण करण्यासाठी या कारला तीन सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. भारताबद्दल बोलताना, एमजी कंपनीची वाहने येथे चांगली कामगिरी करीत आहेत. विक्रीतून कंपनीला सातत्याने फायदा होत आहे. सध्या भारतात एमजी हेक्टर, ग्लॉस्टर आणि एमजी हेक्टर प्लसला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत ही कंपनी आगामी काळात अधिक वाहने लाँच करू शकते.

संबंधित बातम्या

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

(MG Cyberster Electric Roadster Could Go Into Production, car can run 800 kms on single charge)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.