2021 MG Hector SUV भारतात लाँच, किंमत किती?

एमजी या कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 2019 ला दमदार इंट्री केली होती. (Mg Hector 2021 Launch In India)

2021 MG Hector SUV भारतात लाँच, किंमत किती?
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 9:54 PM

मुंबई : एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने भारतात MG हेक्टरची नवी गाडी लाँच केली आहे. एमजी या कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 2019 ला दमदार इंट्री केली होती. त्यानंतर अनेक एकापेक्षा एक चांगल्या गाड्या कंपनीने मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. या गाडीची किंमत 12.89 लाखापासून सुरु होत आहे. या विविध फिचर्स असल्याने सध्या या गाडीची मार्केटमध्ये चांगलीच चर्चा आहे. (Mg Hector 2021 Launch In India)

मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं जाईल. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं. नव्या ट्रान्समिशन अपडेटसह एमजी इंडिया हेक्टरची किंमत जवळपास 50,000-60,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

किंमत

कंपनी या वर्षीच्या मध्यात सात सीटर हेक्टर लाँच करणार होती, पण कोरोना संकटामुळे कंपनीने या कारचे लाँचिंग पुढे ढकलले. भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख ते 18.68 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या CVT युनिट 2021 एमजी हेक्टरची किंमत 50 ते 60 हजारांनी कमी करण्याची शक्यता आहे.

तर MG Hector Plus 7 Seater ची किंमत 6 सीटर मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी अधिक असू शकते, असे बोलले जात आहे. ही कार महिंद्राची अपकमिंग एसयूव्ही New Mahindra XUV500 आणि टाटा मोटर्सची आगामी एसयूवी Tata Gravitas ला टक्कर देणार आहे.

शानदार फिचर्स

हेक्टरकडे स्वतःचे असे अनेक फिचर्स आहेत. कारच्या बाहेरील प्रोफाईलवर एक मोठं ग्रिल, स्वतःची एलईडी डीआरएल शैली, नवीन स्किड प्लेट आमि क्रोम आहे. यामध्ये अपडेटेड आय स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि ड्युल-टोन अपहोल्स्ट्री मिळते. सहा-सीटर हेक्टर अधिक प्रिमीय दिसते. त्यामुळे हेक्टरच्या सात-सीटर एडिशनची सध्या जोरदार चर्चा आहे.

दमदार इंजिन

MG Hector Plus 7 Seater ही कार 6 सीटर एमजी हेक्टर प्लस प्रमाणे तीन इंजिन पर्यांयासोबत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येते. तर 2.0 लीटर डिझेल इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतं.

इतर फीचर्स

या कारच्या सीट पोझिशनमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये सीट्सच्या दुसऱ्या ओळीत (दुसरी रो) 60.40 प्रमाणे सीट असणार आहे. तर थर्ड रोच्या सीट स्लायडिंग फिचर्ससोबत असणार आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर सीट, स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, पॅनारेमिक सनरूफ, कनेक्टेड व्हेईकल टेक्नोलॉजी, मल्टी फंक्शन स्टियरींग व्हीलसोबत सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटर, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. (Mg Hector 2021 Launch In India)

संबंधित बातम्या :

केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

Honda H’ness CB350 कडून विक्रीचे रेकॉर्ड मोडीत, तीन महिन्यात हजारो युनिट्सची विक्री

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.