MG Astor, Hector, Gloster च्या किंमतीत 1.32 लाख रुपयांपर्यंत वाढ, जाणून घ्या सर्व वाहनांच्या नव्या किंमती

| Updated on: Jan 07, 2022 | 3:28 PM

भारतातील अनेक कार निर्माते या महिन्यात त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत जेणेकरुन उत्पादन आणि वाहतुकीचा सतत वाढणारा खर्च भरून निघेल. एमजी मोटर इंडिया देखील या वाहन निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे.

MG Astor, Hector, Gloster च्या किंमतीत 1.32 लाख रुपयांपर्यंत वाढ, जाणून घ्या सर्व वाहनांच्या नव्या किंमती
MG Motor
Follow us on

मुंबई : भारतातील अनेक कार निर्माते या महिन्यात त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत जेणेकरुन उत्पादन आणि वाहतुकीचा सतत वाढणारा खर्च भरून निघेल. एमजी मोटर इंडिया देखील या वाहन निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. दरम्यान, चीनच्या मालकीच्या ब्रिटीश कार निर्मात्या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांच्या किंमती 1.32 लाख रुपयांनी वाढवल्या आहेत. (MG Hector Price Hike from Jan 2022 Up To Rs 1.32 lakhs)

MG Aster ही भारतीय बाजारपेठेतील ब्रँडची सर्वात परवडणारी कार आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या लाइनअपमधील हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल देखील आहे. अ‍ॅस्टरच्या किंमतीमध्ये या महिन्यात 22,000 ते 30,000 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. मात्र एसयूव्हीची सुरुवातीची किंमत अजूनही 10 लाख रुपयांच्या खाली आहे.

MG Hector च्या किमतीत 5,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 45,000 ते 62,000 रुपयांनी महागले आहे, तर डिझेल व्हेरिएंट 50,000 ते 70,000 रुपयांनी महागले आहे. हेक्टर प्लसच्या पेट्रोल व्हेरियंटवर 49,000 ते 61,000 रुपये आणि डिझेल व्हेरिएंटवर 51,000 ते 69,000 रुपयांची वाढ झाली आहे.

भारतातील MG Gloster या ब्रँडचे फ्लॅगशिप मॉडेल आता सुमारे 1.02 लाख रुपये ते 1.32 लाख रुपयांनी महागले आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही – टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा ही कार अजूनही परवडणारी आहे.

एमजी मोटरच्या वाहनांच्या नवीन किमती

  • MG Astor ची नवीन किंमत 9.98 लाख ते 17.73 लाख रुपये आहे. (जुनी किंमत 9.78 लाख रुपये ते 17.38 लाख रुपयांदरम्यान होती)
  • MG Hector च्या Petrol व्हेरिएंटची नवीन किंमत 13.95 लाख रुपये ते 19.28 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (जुनी किंमत 13.50 लाख रुपये ते 18.75 लाख रुपयांदरम्यान होती)
  • MG Hector च्या Diesel व्हेरिएंटची नवीन किंमत 15.49 लाख रुपये ते 19.91 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (जुनी किंमत 14.99 लाख रुपये ते 19.21 लाख रुपयांदरम्यान होती)
  • MG Hector Plus च्या Petrol व्हेरिएंटची नवीन किंमत 15.96 रुपये ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (जुनी किंमत 13.97 लाख रुपये ते 19.50 लाख रुपयांदरम्यान होती)
  • MG Hector Plus च्या Diesel व्हेरिएंटची नवीन किंमत 15.95 रुपये ते 20.50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (जुनी किंमत 15.39 लाख रुपये ते 19.95 लाख रुपयांदरम्यान होती)
  • MG Gloster ची नवीन किंमत 30.99 लाख रुपये ते 38.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (जुनी किंमत 29.98 लाख रुपये ते 37.68 लाख रुपयांदरम्यान होती)

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(MG Hector Price Hike from Jan 2022 Up To Rs 1.32 lakhs)