मुंबई : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्त्रियांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर इंडिया स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही भेट देऊन चमकदार कामगिरीबद्दल भाविनाचा सन्मान करणार आहे. (MG Motor to honour Paralympics silver medalist Bhavina Patel, will gift Astor SUV)
भाविनाच्या या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्विट केले की, “विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल.”
भारतात प्रवेश केल्यापासून आणि हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केल्यापासून एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे, कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात ‘दिव्यांग रन’ नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे.
एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल.
It would be our honour and privilege to gift MG car to Bhavinben on her return @tejal_amin In the mean time, we would explore the right attachments. #VMIndia #TokyoParalympics #DeepaAthlete #tra298 #NationalSportsDay #mgindia https://t.co/BdB1Scxn84
— Rajeev Chaba (@rajeev_chaba) August 29, 2021
ऑटोमोटिव्ह ब्रँड असल्याने एमजीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले नाही तर समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम केले आहे.
गुजरात सरकार त्यांची स्टार टेबल टेनिसपटू भाविनाचा सन्मान करण्याची कोणतीच संधी सोडू इच्छित नाही. ती भारतात परतण्यापूर्वीच सरकारने बक्षिसाची घोषणा केली आहे. सरकारने भाविनाला तब्बल तीन कोटी रुपयांच रोख बक्षिस जाहीर केलं आहे. तसंच भाविनाला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही केली आहे. भाविनाने तिच्या आयुष्यात पैशासह नोकरीसाठी फार संघर्ष केला आहे. पण आता हा संघर्ष संपला असून भाविनाच्या घरचेही खूप आनंदी झाले आहेत. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही भाविनाला पदक जिकल्यानंतर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,‘भाविनाबेनने टोक्यो 2020 पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. गुजरात सरकार भाविनाला बक्षिस म्हणून तीन कोटी रुपये देणार आहे.’
CM Shri @vijayrupanibjp announces a cash prize of ₹ 3 crore for Bhavina Patel, a para-paddler from Mehsana district, under the State Govt’s ‘Divyang Khel Ratna Protsahan Puraskar Yojana’ for her historic achievement at the #TokyoParalympics
— CMO Gujarat (@CMOGuj) August 29, 2021
भाविना पटेलने रौप्य पदक जिंकताच तिच्या घरातल्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब गरबा करुन आनंद व्यक्त करत आहे. तर संपूर्ण परिसरात मिठाई देखील वाटली जात आहे. भाविनाचे कुटुंबिय गरबा खेळत असलेला व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
#WATCH Family members and friends of Para-paddler Bhavina Patel in Mehsana perform ‘garba’ to celebrate her bringing home a Silver medal in her maiden Paralympic Games pic.twitter.com/h55CAAycOG
— ANI (@ANI) August 29, 2021
(MG Motor to honour Paralympics silver medalist Bhavina Patel, will gift Astor SUV)