MG च्या छोटू EV Air ची एकच हवा, किंमत आणि भारतात कधी लाँच होणार ? जाणून घ्या
एमजी लवकरच आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार एअर इलेक्ट्रिक लाँच करणार आहे. ही इलेक्ट्रिक कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाईल,अशी जोरदार चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. आता इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या जी 20 दरम्यान ही इव्ही सादर केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत. पण इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत अधिक असल्याने बजेट बाहेर जातात. त्यामुळे अनेक जण बजेट नसल्याने पेट्रोल डिझेल गाड्यांकडे मोर्चा वळवतात. असं असताना एमजी लवकरच आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार एअर इलेक्ट्रिक लाँच करणार आहे. या गाडीची किंमत अंदाजे 10 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.ही इलेक्ट्रिक कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाईल,अशी जोरदार चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. एमजी एअर इव्ही कंपनीच्या ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आता इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या जी 20 दरम्यान ही इव्ही सादर केली जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाहनाचे इंटीरियर स्पाय शॉटमधून उघड झाले आहेत. यामध्ये डॅशबोर्डचे डिझाइन दिसत आहे.इन्फोटेनमेंट स्क्रीन एसी व्हेंट्सच्या खाली ठेवली आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये 20KWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गाडी आरामात 200 ते 300 किमीचा पल्ला गाठू शकते. ही गाडी भारतात या वर्षीच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे.एमजी मोटर इंडिया या गाडीमध्ये काही बदल करण्याची देखील शक्यता आहे. क्लायमेट कंट्रोल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम दिलं जाईल.यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मदत होऊ शकेल. पुढच्या भागात एलईडी लाइट बार मिळू शकतो. तसेच सेंटरमध्ये चार्जिंग पॉईंट मिळेल.
गाडीची लांबी, रुंदी आणि उंची
या गाडीचं आकारमान वुलिंग एअर इव्हीसारखंच असण्याची दाट शक्यता आहे. या गाडी लांबी 2974 मीमी, रुंदी 1505 मीमी आणि उंची 1631 मीमी असू शकते. गाडीचा व्हिलबेस 2010 मीमी असेल. म्हणजेच ही गाडी टाटा टियागो इव्हीपेक्षा लहान असेल. त्यामुळे ही गाडी भविष्यात टाटा टियागो इव्हीशी स्पर्धा करेल, असं सांगण्यात येत आहे.