मारुती, टाटा आणि रेनॉच्या ‘या’ तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती

| Updated on: Jul 24, 2021 | 4:59 PM

सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे.

मारुती, टाटा आणि रेनॉच्या या तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती
tata-tiago
Follow us on

मुंबई : एंट्री-लेव्हल कार देशातील वाहन उत्पादकांसाठी ब्रेड अँड बटर सेगमेंट निर्माण करतात. वर्षानुवर्षे, एकूणच विक्रीसाठी एंट्री-लेव्हल सेगमेंटचे महत्त्वपूर्ण योगदान राहीलं आहे, अगदी अलीकडे जेव्हा युटिलिटी व्हीकल्स सेगमेंट आणि बी-सेगमेंट एकंदरीत विक्रीसाठी मोठा हातभार लावत आहेत. अलिकडच्या काळात एंट्री-लेव्हल सेगमेंटमधील विक्रीत लक्षणीय घट झाली असली तरी, दरमहा संचयी विक्रीमध्ये या सेगमेंटचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. (Middle class family buying these three entry level cars of Maruti, Tata and Renault)

सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती. जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री साधली आहे. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2020 मधील 6,972 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वॅगन आरच्या विक्रीत मारुती सुझुकीने 179 टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे वॅगन आरने देशातील स्विफ्ट हॅचबॅक कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

टाटा टियागो

ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. ही कार XE, XT, XTA, XZA, XZA, XZ +, XZ + DT, XZA + आणि XZA + DT सह 9 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.85 लाख ते 6.84 लाख रुपयांदरम्यान आहे. यामध्ये तुम्हाला 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल जे 5-स्पीड मॅनुअल किंवा ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येतं. टाटा मोटर्सने जून महिन्यात या कारच्या 4,881 युनिट्सच्या विक्रीसह एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. तर कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात टियागोच्या 4,069 युनिट्सची विक्री केली होती.

रेनॉ क्विड

ही कार दोन पेट्रोल इंजिनांसह येते. ज्यामध्ये 0.8 लीटर आणि दुसरं 1.0 लीटरचं इंजिन आहे. ही कार पाच वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये येते. ज्यामध्ये STD, RXE, RXL, RXT आणि Climber चा समावेश आहे. ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटरपर्यंत धावते. या कारची किंमत 3.12 लाख रुपये ते 5.31 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही एक्स शोरुम दिल्लीतली किंमत आहे. कंपनीने जून 2021 मध्ये 2,161 युनिट्स च्या विक्रीसह तिसरं स्थान पटकावलं आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात टियागोच्या 2,441 युनिट्सची विक्री केली होती.

इतर बातम्या

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

(Middle class family buying these three entry level cars of Maruti, Tata and Renault)