Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Discounts | कारच्या स्वप्नाला सवलतीचे पंख! मिळवा 1 लाखापर्यंतची सूट

Car Discounts | वर्षाच्या अखेरीस सवलतीत कार खरेदी करता आली नाही? मग आता या कंपनीने नवीन वर्षाचा मुहूर्त साधत सवलत आणली आहे. होंडा कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला कारवर सवलतीची ऑफर आणली आहे. होंडा सिटी, होंडा सिटी हायब्रिड आणि अमेझ या मॉडलवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

Car Discounts | कारच्या स्वप्नाला सवलतीचे पंख! मिळवा 1 लाखापर्यंतची सूट
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 11:11 AM

नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : 2023 संपण्यापूर्वी ऑटो कंपन्यांनी कार खरेदीसाठी झटपट डिस्काऊंट दिले. अनेक कंपन्यांनी इयर इंडिंगवर सवलतीचा पाऊस पाडला. जर तुम्हाला कार खरेदी करता आली नाही, या ऑफरचा फायदा उठवता आला नाही तर पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. दिग्गज ऑटो कंपनी होंडाने त्यांच्या नवीन कार खरेदीवर बंपर सवलत दिली आहे. होंडा सिडेन कारवर जोरदार सवलत देत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुम्ही होंडाची नवीन कार खरेदी करत असाल तर तुम्हाला या खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. होंडा सिटी, होंडा सिटी हायब्रिड आणि अमेझ या मॉडलवर ही सवलत मिळेल.

कार खरेदीवर सवलतींचा पाऊस

होंडाची कार खरेदीसाठी कॅश डिस्काऊंट, कॉर्पोरेट डिस्काऊंट, एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनसच्या अंतर्गत सवलत मिळेल. जर तुम्हाला कार खरेदीवर मोठी बचत करायची असेल तर ही सर्वात चांगली संधी आहे. होंडाच्या तीन सिडेन कार जोरदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह येतात.

हे सुद्धा वाचा

Honda City e:HEV: 1 लाखपर्यंतची सवलत

होंडा सिटी हायब्रिडच्या 2024 मधील मॉडलवर ही सवलत मिळणार नाही. जर तुम्ही 2023 मधील मॉडल खरेदी करणार असाल तर ही सवलत मिळेल. होंडा सिटी हायब्रिड खरेदीवर 1 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. कंपनी थेट रोखीत सवलत देत आहे. या कारवर इतर कोणताही फायदा देण्यात येणार नाही. या कारवर तुम्हाला थेट कॅश डिस्काऊंट मिळेल. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.89 लाख रुपये ते 20.39 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Honda City: 88,600 रुपये वाचवा

या महिन्यात होंडा सिटी कारवर डिस्काऊंटचा फायदा मिळेल. जानेवारी महिन्यात या कार खरेदीवर 88,600 रुपयांपर्यंतची बचत करता येईल. कंपनी 40,000 रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काऊंट, 4,000 रुपये पर्यंतचे लॉयल्टी बोनस, 6,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 25,000 रुपयांपर्यंत स्पेशल कॉर्पोरेट बेनिफिट्स देत आहे.

Honda Amaze: 72,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट

2023 आणि 2024 मॉडल्सच्या होंडा अमेजवर 72,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळते. या सिडेनची एक्स-शोरूम किंमत 7.10 लाख रुपये ते 9.86 लाख रुपयांपर्यंत आहे. तर E ट्रिमवर 52,000 रुपये आणि VX ट्रिमवर 62,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. S ट्रिम वर 45,000 रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 4,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी रिवार्ड आणि 23,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

(डिस्क्लेमर: डिस्काउंट ऑफर्स लोकेशन आणि स्टॉकवर निर्धारीत आहे. अधिक माहितीसाठी होंडाच्या जवळच्या शोरूमशी संपर्क साधा.)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.