काय बोलता! विक्रीमध्ये Ertiga ने Wagonr कारला मागे टाकले
Best Selling Maruti Suzuki Car: यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी कार Ertiga असून तिने Wagonr ला मागे टाकले आहे. यंदा मारुतीची 7 सीटर एमपीव्ही Ertiga लोकांना सर्वाधिक आवडली. Ertiga आणि वॅगनआरचा यंदाचा मासिक निहाय विक्री अहवाल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घेऊया.
Best Selling Maruti Suzuki Car Ertiga असून तिने Wagonr ला मागे टाकले आहे. यंदा मारुतीची 7 सीटर एमपीव्ही Ertiga लोकांना सर्वाधिक आवडली. असं आम्ही का म्हणत आहोत? असाच प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? काळजी करू नका. याचंच उत्तर आम्ही आज देणार आहोत.
भारतीय बाजारपेठेत यंदा हॅचबॅकपेक्षा एसयूव्ही आणि एमपीव्हीला अधिक मागणी आहे आणि कार विक्रीचे आकडे हे स्पष्टपणे दर्शवतात. उदाहरणार्थ, देशातील सर्वात जास्त विक्री होणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारबद्दल बोलायचे झाले तर 7 सीटर Ertiga यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत बेस्ट सेलर ठरली आणि तिने Wagonr हॅचबॅकला मागे टाकले.
ज्या प्रकारे Ertiga ची बंपर विक्री सुरू आहे, त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अर्टिगा आघाडी कायम ठेवू शकते, असे मानले जात आहे. सध्या आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या या टॉप 2 कारच्या जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीतील विक्रीचे आकडे सविस्तर सांगणार आहोत.
मारुती Ertiga चा मासिक विक्री रिपोर्ट
भारतात मारुती सुझुकीची 7 सीटर कॉम्पॅक्ट एमपीव्ही Ertiga पेट्रोल आणि सीएनजी पर्यायात उपलब्ध आहे. Ertiga ची सध्याची एक्स शोरूम किंमत 8.69 लाख ते 13.03 लाख रुपयांपर्यंत आहे. एमपीव्हीने यावर्षी नोव्हेंबरपर्यंत 1,74,035 युनिट्सची विक्री केली आहे आणि महिन्या-दर-महिना विक्री अहवाल खालीलप्रमाणे आहे:
Ertiga च्या मासिक विक्रीची आकडेवारी
जानेवारी – 14,632 युनिट
फेब्रुवारी – 15,519 युनिट्स
मार्च – 14,888 युनिट
एप्रिल – 13,544 युनिट्स
मे – 13,893 युनिट
जून – 15,902 युनिट
जुलै – 15,701 युनिट्स
ऑगस्ट – 18,580 युनिट
सप्टेंबर – 17,441 युनिट
ऑक्टोबर – 18,785 युनिट
नोव्हेंबर – 15,150 युनिट
मारुती सुझुकी Wagonr मासिक विक्री रिपोर्ट
मारुती सुझुकीची फॅमिली हॅचबॅक Wagonr ही छोट्या कुटुंबाची आवडती कार असून याची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून 7.33 लाख रुपयांपर्यंत सुरू होते. Wagonr ने यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण 1,73,552 वाहनांची विक्री केली. यावर्षी Wagonr च्या मासिक विक्रीची आकडेवारी पहा:
Wagonr च्या मासिक विक्रीची आकडेवारी
जानेवारी – 17,756 युनिट्स
फेब्रुवारी – 19,412 युनिट्स
मार्च – 16,638 युनिट्स
एप्रिल – 17,850 युनिट्स
मे – 14,492 युनिट्स
जून – 13,790 युनिट्स
जुलै – 16,191 युनिट्स
ऑगस्ट – 16,450 युनिट्स
सप्टेंबर – 13,339 युनिट्स
ऑक्टोबर- 13,922 युनिट्स
नोव्हेंबर- 13,982 युनिट्स