दमदार फीचर्ससह भारतात 2021 Jeep Compass लॉन्च, किंमत तब्बल….
जीप इंडियाने भारतात 2021 Jeep Compass Facelift ला लॉन्च केलं आहे. या शानदार SUV ची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 28.29 लाख रुपयांपर्यंत आहे.

मुंबई : जीप इंडियाने भारतात 2021 Jeep Compass Facelift ला लॉन्च केलं आहे (New 2021 Jeep Compass Facelift Launched). या शानदार SUV ची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 28.29 लाख रुपयांपर्यंत आहे. 2017 मध्ये सुरुवात केल्यानंतर जीप कम्पास भारत कंपनीसाठी एक मुख्य आधार राहिला आहे. भारत 2021 जीप कम्पासाठी ग्लोबल स्तरावर दुसरा बाजार आहे (New 2021 Jeep Compass Facelift Launched).
2021 मॉडेलच्या डॅशबोर्डची डिझाईन पूर्णपणे नवीन आहे आणि यामध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीनसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसोबत नवीन UConnect 5 सिस्टम मिळते. दुसरी विशेषता म्हणजे व्हेटिंलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, फुल डिजीटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि एक नवीन 360-डिग्री पार्किंग कॅमराही आहे. जीप ने इन-कार कंट्रोलसाठी नवीन नॉब आणि बटणसोबत प्रिमिअम सॉफ्ट-टच मटेरिअलचा वापर केला आहे.
या गाडीची टक्कर ह्युंडई Tucson, टाटा हॅरिअर आणि एमजी हेक्टरसोबत असेल. 2021 Compass SUV ची सर्वात खास बाब म्हणजे याची स्टाईल आणि अनेक महत्त्वाचे फीचर्स आहे ज्यामुळे ही आपल्या सेगमेंटमधील दुसऱ्या सर्व गाड्यांना मागे सोडू शकते.
डॅशबोर्डचं डिझाईन अपडेट झालं
SUV मध्ये तुम्हाला स्लॉट ग्रिल, ट्रॅपिजॉअडल व्हिल आर्क्स, रिफ्लेक्टर्ससोबत हेडलाईट्स आणि LED प्रोजेक्टर्स देण्यात आले आहेत. दमदार लुकसाठी कंपनीने डॅशबोर्डच्या डिझाईनला अपडेट केलं आहे. ग्राहक येथे ड्युअल टोन आणि फुल ब्लॅग कॉम्बिनेशनमधून कुठल्याही व्हेरिएंटला निवडू शकतात. या व्हिकलमध्ये नवीन स्टिअरिंग व्हील आमि अपडेटेड इंस्ट्रूमेंट पॅनल देण्यात आलं आहे. यामध्ये सेंट्रल कंसोलची स्टोरेज कॅपेसिटी जास्त देण्यात आली आहे.
गाडीमधील दमदार फीचर्स
फीचर्सच्या बाबतील अपडेटेड कम्पासमध्ये स्टिअरिंग व्हिलवर देण्यात आलेल्या बटन्सच्या मदतीने तुम्ही सहज स्क्रीनपर्यंत पोहोचू शकता. विशेष म्हणजे, एफसीए इंडियाच्या नुसार, सर्व प्रवासी 20 इंचापेक्षा जास्त डिजीटल स्क्रीन स्पेसचा आनंद घेऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, सेलेकटरेन 4×4 सिस्टम, 6 अयरबॅग, पॅनिक ब्रेक असिस्ट, ब्रेक सपोर्ट सारख्या 50 पेक्षा जास्त सुविधा आहेत.
अवघ्या 17 महिन्यांमध्ये 2 लाख कार्सची विक्री, KIA Motors ने रचला इतिहास#KiaSeltos #KiaSonet #KiaMotors https://t.co/gpII8spqhj
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
New 2021 Jeep Compass Facelift Launched
संबंधित बातम्या :
बजाजची ‘ही’ बाईक फक्त 7 हजार रुपयांमध्ये मिळणार, जाणून घ्या कुठे? कशी?
बहुप्रतीक्षित 2021 KTM 890 Duke लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात?