Car Service | पहिल्यांदा कार सर्विसला नेताय? काय काळजी घ्याल?
Car Service | कार सर्विसला नेण्याआधी घरातून निघताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आधीच काळजी घेतली नाही, तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. ज्यामुळे तुमचाच त्रास वाढेल. काय-काय तयारी केली पाहिजे? त्या बद्दल जाणून घ्या.
Car Service | कारला फिट अँड फाइन ठेवायच असेल, तर सर्विसिंग खूप आवश्यक आहे. सामान्यपणे गाडीची सर्विसिंग 10 हजार किलोमीटर पळाल्यानंतर करण्याचा सल्ला देण्यात येतो. Car Service मुळे दीर्घकाळ तुम्हाला कारची सेवा मिळते. त्यात बिघाड होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही पहिल्यांदा कार सर्विसला नेत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही काय-काय काळजी घ्याल? त्या बद्दल जाणून घ्या.
तुम्ही तुमची नवीन कार पहिल्यांदा सर्विसला घेऊन जात असाल, तर घरातून निघण्यापूर्वी एक गोष्ट करावी लागेल. नव्या कारसोबत कंपनी ग्राहकांना तीन फ्री सर्विस ऑफर करते. तुम्ही सर्विस बुक सोबत घेऊन जायला विसरलात, तर अडचण येईल.
कार सर्विसला नेण्याआधी तुम्हाला घरच्या घरीच एक चेक लिस्ट बनवावी लागेल. यात कार चालवताना तुम्हाला काय समस्या जाणवतात त्या बद्दल लिहून काढा. म्हणजे सर्विस सेंटरला गेल्यानंतर एखादी गोष्ट सांगायची राहून जाणार नाही.
उदहारणार्थ कार चालवताना तुम्हाला एखादा आवाज येत असेल किंवा कुठली तार बाहेर दिसत असेल, लाइट काम करत नसेल, तर कार सर्विसला देण्याआधी सर्विस सेंटरवर काम करणाऱ्या व्यक्तीला या बद्दल सांगा.
घरातून निघताना आणि सर्विस सेंटरला पोहोचल्यानंतर कार देण्याआधी किलोमीटर जरुर चेक करा. ते नोट करुन ठेवा, कारण कार सर्विसला दिल्यानंतर ती किती चालवती गेली, हे तुम्हाला समजेल. घरातून निघण्याआधी कारमध्ये किती इंधन आहे, ते सुद्धा नोट करुन ठेवा.