Zelio X Men : कमी किंमतीत लॉन्च झाली नवीन Electric Scooter, फुल चार्जमध्ये धावणार इतके किलोमीटर

Electric Scooter under 1 Lakh : तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर मार्केटमध्ये नव्या स्कूटरची एंट्री झाली आहे. या स्कूटरच नाव आहे, Zelio X Men. या स्कूटरची किंमत किती? ही स्कूटरचे किती वेरिएंट आहेत? किती किलोमीटरची ड्रायविंग रेंज मिळेल?

Zelio X Men : कमी किंमतीत लॉन्च झाली नवीन Electric Scooter, फुल चार्जमध्ये धावणार इतके किलोमीटर
new electric scooter
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 2:04 PM

इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्टअप Zelio Ebikes ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी एक नवीन Electric Scooter लॉन्च केली आहे. Zelio X Men या इलेक्ट्रिक स्कूटरच नाव आहे. कंपनीने या स्कूटरचे तीन वेरिएंट्स बाजारात आणले आहेत. ही स्कूटर व्हाइट, ब्लॅक, रेड आणि सी ग्रीन रंगात तुम्ही विकत घेऊ शकता.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व वेरिएंटमध्ये कंपनीने 60/72V BLDC मोटर दिली आहे. ही स्कूटर खूप लाइटवेट आहे. या स्कूटरच वजन 80 किलोग्राम आहे, असा कंपनीचा दावा आहे. ही स्कूटर 180 किलो पर्यंत वजन उचलू शकते. या स्कूटरची किंमत, या स्कूटरच्या सर्व वेरिएंट्स, ड्रायविंग रेंजबद्दल माहिती जाणून घ्या.

Zelio X Men Price

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 64 हजार 543 रुपये (एक्स-शोरूम) सुरु होते. या स्कूटरच्या टॉप वेरिएंटसाठी 87 हजार 573 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. या स्कूटरचे सर्व वेरिएंट्स, ड्रायविंग रेंज आणि स्कूटरमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल जाणून घ्या.

Zelio X Men Range : सर्व वेरिएंट्सची ड्रायविंग रेंज डिटेल्स

बेस वेरिएंटमध्ये 60V/32AH लेड-एसिड बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ लागतो. या स्कूटरच बेस वेरिएंट फुल चार्जमध्ये 55 ते 60 किलोमीटर पळेल.

दुसऱ्या वेरिएंटमध्ये 72V/32AH लेड-एसिड बॅटरी आहे. ही स्कूटर चार्ज होण्यासाठी 7 ते 9 तासांचा वेळ लागतो. ड्रायविंग रेंजबद्दल बोलायच झाल्यास, फुल चार्ज झाल्यानंतर स्कूटर 70 किलोमीटरपर्यंत पळू शकते.

किती किलोमीटर पळेल?

टॉप मॉडलमध्ये 60V/32AH लिथियम-ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. फुल चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 80 किलोमीटर पर्यंत पळेल.

Zelio X Men Features

ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एंटी-थेफ्ट अलार्म, रियर ड्रम ब्रेक, फ्रंट डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स सोबत मिळेल. त्या शिवाय, यात रिवर्स गियर, पार्किंग स्विच, यूएसबी चार्जर, हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, सेंट्रल लॉकिंग आणि डिजिटल डिस्प्ले सारखे खास फीचर्स आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.