AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार, Kia ची शानदार 8 सीटर कार भारतात लाँच होणार

किआ मोटर्सने (Kia Motors) 2020 मध्ये न्यू जनरेशन कार्निवल एमपीव्ही (New-Gen Kia Carnival MPV) सादर केली आहे.

VIDEO | क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार, Kia ची शानदार 8 सीटर कार भारतात लाँच होणार
2021 Kia Carnival Crash Test
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 7:25 PM

मुंबई : किआ मोटर्सने (Kia Motors) 2020 मध्ये न्यू जनरेशन कार्निवल एमपीव्ही (New-Gen Kia Carnival MPV) सादर केली आहे. ही कार जगभरातील बर्‍याच बाजारांमध्ये उपलब्ध आहे. भारतात ही कार 2022 मध्ये लाँच केली जाणार आहे. या कारचे हे 4th जनरेशन मॉडेल आहे. (New-Gen Kia Carnival MPV scores 5 Star in NCAP Crash test, going to launch in India Soon)

NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार

या कारची नुकतीच क्रॅश टेस्टिंग पूर्ण झाली आहे. या कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. ही एक 8 सीटर कार आहे. ही कार बर्‍याच हाय एंड सेफ्टी फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. यामध्ये कार हेड प्रोटेक्टिंग एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

सध्या भारतात उपलब्ध असलेल्या कार्निवलमध्ये कम्प्लायंट 2.2 लीटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 202 एचपी पॉवर आणि 441 एनएम टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त या कारमध्ये 8 स्पीड स्पोर्ट्समॅटिक ट्रान्समिशन आहे.

किआ कार्निवल ही भारतातील कंपनीची पहिली एमपीव्ही आहे. या व्यतिरिक्त कंपनीने किआ सेल्टॉस आणि किआ सोनेट या कारदेखील भारतात लॉन्च केल्या आहेत. भारतात, ही कार टोयोटा इनोव्हा आणि फॉर्च्युनर सारख्या कारशी स्पर्धा करते.

किआ कार्निवल इंटरनॅशनल मॉडेल

या कारचे आंतरराष्ट्रीय मॉडेल 3 इंजिन पर्यायांसह येते. यात 3.5 लीटर V6 MPi पेट्रोल, 2.2 लीटर डिझेल आणि 3.5 लीटर GDi V6 पेट्रोल इंजिनाचा समावेश आहे. भारतीय मॉडेलमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते.

Kia चा नवा विक्रम; भारतात रेकॉर्डब्रेक विक्री

गेल्या वर्षभरात नावारुपाला आलेल्या किआ कंपनीने (Kia Motors) भारतीय बाजारपेठेत दमदार कामगिरी करुन दाखविली आहे. कंपनीने भारतात एक लाखाहून अधिक कनेटेक्ड कार्सची विक्री केली आहे. किआ कंपनीकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून याविषयी माहिती देण्यात आली. (Kia sells one lakh connected cars)

भारतातील एकूण कनेक्टेड कारविक्रीमध्ये किआचा वाटा 55 टक्के इतका आहे. किआच्या Seltos GTX Plus DCT 1.4 टर्बो मॉडेलची भारतात सर्वाधिक विक्री झाली. किआच्या एकूण कनेक्टेड कार विक्रीत सेल्टो जीटीएक्स या कार विक्रीचे प्रमाण 15 टक्के इतके आहे.

इतर बातम्या

देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय

(New-Gen Kia Carnival MPV scores 5 Star in NCAP Crash test, going to launch in India Soon)

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.