Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki ची सर्वात जास्त मायलेज देणारी कार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे लोक आता कार घेताना जास्तीत जास्त मायलेजचा आग्रह धरतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती आता मायलेज देणाऱ्या कारला आहे. याचा विचार करता देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने एक नवीन कार लॉन्च केली आहे.

Maruti Suzuki ची सर्वात जास्त मायलेज देणारी कार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Maruti Celerio 2021
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 6:00 PM

मुंबई : महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे लोक आता कार घेताना जास्तीत जास्त मायलेजचा आग्रह धरतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती आता मायलेज देणाऱ्या कारला आहे. याचा विचार करता देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने एक नवीन कार लॉन्च केली आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त मायलेज मिळेल असा दावा केला जात आहे. (New-gen Maruti Suzuki Celerio India launched, car gives 26kmpl mileage)

खरं तर, बुधवारी मारुती सुझुकी इंडियाने मिड-हॅचबॅक सेगमेंटमध्ये नवीन सेलेरियो लाँच केली. कंपनीचा दावा आहे की, नवीन मारुती सुझुकी सेलेरियो एक लीटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी पर्यंत धावू शकेल. कंपनीने मारुती सेलेरियो 4.99 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे.

सध्या बाजारात असलेली मारुती सेलेरियो 21.63 ते 23 kmpl इतकं मायलेज देते, ज्याला ARAI ने मान्यता दिली आहे. त्याच वेळी, Hyundai ची Santro 20 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. सँट्रोची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 4,76,690 रुपयांपासून सुरू होते.

बलेनो आणि स्विफ्टपेक्षा जास्त मायलेज!

दुसरीकडे, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी बलेनो सेलेरियो व्यतिरिक्त सर्वाधिक मायलेज देतात. या दोन्ही कार सुमारे 24 kmplचा मायलेज देतात. स्विफ्टची सुरुवातीची किंमत 5.85 लाख रुपये आणि मारुती सुझुकी बलेनोची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये आहे.

दुसरीकडे, टाटाची एंट्री-लेव्हल कार Tata Tiago पेट्रोलमध्ये सरासरी 20 किमी मायलेज देते. Tata Tiago ची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे.

नवीन Maruti Celerio बद्दल कंपनीचा दावा आहे की, ती एका लीटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी मायलेज देते. मायलेज व्यतिरिक्त कंपनीने कार्बन उत्सर्जनावरही लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, मारुती सेलेरियो फक्त 88.86 ग्रॅम प्रति किमी कार्बन उत्सर्जित करते.

नवीन मारुती सेलेरियोचे इंजिन ड्युअल VVT, ड्युअल इंजेक्टर आणि कूल्ड ERG वर काम करेल. यामुळे इंजिनचे पंपिंग सायकल सुधारते आणि कारचे मायलेजही वाढते. हे 1.0 लिटरचे K10C पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 65hp पॉवर जनरेट करते आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल.

मारुती सेलेरिओमध्ये सुरक्षेवरही लक्ष केंद्रित!

नवीन मारुती सेलेरियोमध्ये कंपनीने सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले आहे. एबीएस व्यतिरिक्त, ड्युअल एअर बॅग, हिल असिस्ट सुविधा देखील सेगमेंटमध्ये प्रथमच प्रदान करण्यात आली आहे. मारुतीने 5व्या पिढीतील Heartect प्लॅटफॉर्मवर नवीन Celerio विकसित केली आहे, जी क्रॅश झाल्यास होणारे नुकसान कमी करते. अलीकडे, मारुतीच्या स्विफ्ट आणि बलेनो सारख्या प्रीमियम कार्सना सुरक्षिततेत शून्य रेटिंग मिळाले आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(New-gen Maruti Suzuki Celerio India launched, car gives 26kmpl mileage)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.