नवीन Hyundai i20 चा धुमाकूळ, 20 दिवसात 20 हजार युनिट्सचे रेकॉर्डब्रेक बुकिंग

Hyundai India ने काही दिवसांपूर्वी प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 ही कार भारतात लाँच केली होती, या कारला भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

नवीन Hyundai i20 चा धुमाकूळ, 20 दिवसात 20 हजार युनिट्सचे रेकॉर्डब्रेक बुकिंग
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 8:53 AM

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India ची प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 (all new i20) ही कार 06 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आली. तर लाँचिंगपूर्वीच 28 ऑक्टोबरपासून या कारच्या बुकींगला सुरुवात करण्यात आली आहे. ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बुकिंगला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये या कारच्या 20 हजार युनिट्सची रेकॉर्डब्रेक बुकिंग करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 4000 युनिट्सची डिलीव्हरीदेखील केली आहे. (New hyundai i20 bookings crossed to 20 thousand units in just 20 days, check ist price and specs)

ही कार पेट्रोल, डिझेल, टर्बो पेट्रोल बीएस-6 इंजिन आणि ट्रान्समिशनसह सज्ज आहे. ज्यामध्ये फर्स्ट इन-सेगमेंट इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आईएमटी), इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आईवीटी), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आणि मॅन्युअल व्हेरिएंटचा समावेश आहे. all new i20 कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.79 लाख रुपये ते 11.17 लाख रुपयांमध्ये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपयांपासून ते 10.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमती 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे.

नवीन i20 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ज्यामध्ये 83hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्सचा पर्याय आहे. डिझेल इंजिन 1.5 लीटर टर्बो यूनिट आहे जे 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क निर्माण करु शकतं. डिझेल इंजिनासह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा आहे. या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos या कारमध्ये यापूर्वी वापरण्यात आले आहे.

नवीन i20 च्या फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटतो. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.

कंपनीने या कारबाबत म्हटलं आहे की, ऑल-न्यू आय-20 ही कार ‘लाइट वेट प्लेटफॉर्म’वर बनवण्यात आली आहे. ही कार वजनाने हलकी आहे. ही कार 66 टक्के ‘अॅडव्हान्स्ड अँड हाय स्ट्रेंथ स्टील’द्वारे बनवण्यात आली आहे. ही कार ग्राहकांना पूर्ण सुरक्षा देण्यास सक्षम आहे. या कारचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे.

Hyundai i20 च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किंमती

मॅग्ना पेट्रोल – 6.79 लाख रुपये मॅग्ना डिझेल – 8.19 लाख रुपये स्पोर्ट्ज पेट्रोल – 7.59 लाख रुपये स्पोर्ट्ज डिझेल- 8.99 लाख रुपये स्पोर्ट्ज IVT – 8.59 लाख रुपये Asta – 8.69 लाख रुपये Asta IVT – 9.69 लाख रुपये Asta(O) पेट्रोल – 9.19 लाख रुपये Asta (O) डिझेल – 10.59 लाख रुपये

10 टक्के कॅशबॅक ऑफर

Click To Buy प्लॅटफॉर्मद्वारे नवीन i20 कार बुक करणाऱ्या HDFC आणि ICICI या बँकांच्या ग्राहकांना बुकिंग अमाऊंटवर 10 टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले की, i20 हा ह्युंदाई कंपनीसाठी सुपर परफॉर्मर ब्रँड ठरला आहे. ही कार गेल्या एक दशकापासून आधुनिक भारतीय ग्राहकांच्या पसंतील उतरत आहे. ऑल न्यू आय 20 प्रिमियम कारने हॅचबॅक सेगमेंटमध्ये शानदार स्टाईल आणि नव्या उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे एक बेन्चमार्क सेट करुन ठेवला आहे.

संबंधित बातम्या

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Kia Motors च्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या

(New hyundai i20 bookings crossed to 20 thousand units in just 20 days, check ist price and specs)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.