Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाँचिंगपूर्वीच Kawasaki Ninja 300 साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जपानी दुचाकी निर्माती कंपनी कावासाकी इंडिया (Kawasaki India) मार्चमध्ये त्यांची नवीन बाईक निंजा 300 (Ninja 300) सादर करणार आहे.

लाँचिंगपूर्वीच Kawasaki Ninja 300 साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
New Kawasaki Ninja 300
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 8:42 AM

मुंबई : जपानी दुचाकी निर्माती कंपनी कावासाकी इंडिया (Kawasaki India) मार्चमध्ये त्यांची नवीन बाईक निंजा 300 (Ninja 300) बाजारात सादर करणार आहे. कावासाकी डीलर्सनीही या बाईकचे बुकिंग सुरू केले आहे. या बाईकबद्दल गेल्या आठवड्यातच बातमी आली होती, परंतु कंपनीच्या वेबसाइटवर ही माहिती अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही. (New Kawasaki Ninja 300 to launch in India in March, Dealers started doing unofficial bookings)

यापूर्वी जाहीर केलेल्या लाइम ग्रीन कलरव्यतिरिक्त कंपनी ही बाईक लाइम ग्रीन / इबोनी आणि ब्लॅक कलर स्कीममध्ये देखील बाजारात आणणार आहे. नवीन पेंट स्कीमव्यतिरिक्त, यामध्ये ग्राफिक सेट देखील अपडेट केला जात आहे. तथापि, दुचाकीच्या एक्सटीरियर लुकमध्ये आणखी कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या बाईकचं डिझाईन फीचर बाईकच्या जुन्या मॉडेलमधूनच घेतलं गेलं आहे. या बाईकच्या फ्रंटमध्ये ट्विन-पॉड हेडलाइट्स, फेयरिंग इंटिग्रेटेड फ्रंट ब्लिंकर्स, मस्क्युलर इंधन टाकी (फ्युल टँक), स्प्लिट-स्टाईल सीट आणि एक्झॉस्टवर क्रोम हीटशिल्ड मिळेल.

इंजिन आणि फीचर्स

नवीन Ninja 300 या दुचाकीचे अन्य स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, या बाईकमध्ये बीएस 6 कम्पिलियंट 296 सीसीचे लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक पॅरेलल-ट्विन इंजिन मिळेल. याशिवाय आधीच्या बाईकप्रमाणे 6 स्पीड ट्रान्समिशनही मिळेल. हे इंजिन 11000 आरपीएम वर 39 पीएस उर्जा आणि 10,000 आरपीएम वर 27.0 एनएम टॉर्क जनरेट करेल.

किंमत किती?

नवीन Ninja 300 मध्ये तुम्हाला आधीच्या BS 4 मॉडलवाले इक्विपमेंट आणि पार्ट्स मिळतील. बाईकच्या फ्रंटला टेलीस्कोपिंक फ्रंट फोर्क्स, रियर-मोनो शॉक, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल एबीएस आढळतील. या बाईकची किंमत 3 लाख ते 3.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असू शकते. दरम्यान, कंपनी या बाईकसह आणखी एक नवीन बाईक बाजारात आणणार आहे. या बाईकची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनी लवकरच या नव्या बाईकची घोषणा करु शकते.

इतर बातम्या

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

तुमची पर्सनॅलिटी आणि बाईकनुसार ऑनलाईन हेल्मेट डिझाईन करा, घरपोच डिलिव्हरी मिळवा

अवघ्या 60 हजारात खरेदी करा 74 kmpl मायलेज देणारी बाईक

(New Kawasaki Ninja 300 to launch in India in March, Dealers started doing unofficial bookings)

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.