नवीन मारुती डिझायर कार लॉन्च,काय आहेत फिचर्स आणि किंमत ?
मारुती सुझुकी कंपनीची नवीन डिझायर कार अखेर लॉंच करण्यात आली आहे. मारुती कंपनीने लॉंच केलेल्या या नव्या डिझायरने अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहे. चला तर या नव्या गाडीची किंमत किती आणि ती किती मायलेज देणार हे पाहूयात
देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मोठ्या प्रतिक्षेनंतर आपली सर्वात सेफेस्ट कार मारुती डीझायर ( Maruti Dzire ) फोर्थ जनरेशन मॉडेलला विक्रीसाठी लॉंच केले आहे. या कारमध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहे. आकर्षक लुक सोबत दमदार फिचर्सच्या या सेडान कारची सुरुवातीची किंमत 6.79 लाख रुपये ( एक्स-शोरूम) असणार आहे. या कारला सनरुफचे फिचर्स देण्यात आले असून सात रंगात ही कार उपलब्ध असणार आहे.
व्हेरिएंट्स कोणते ?
नवीन मारुती डिझायरला चार वेरिएंट्स LXi, VXi, ZXi, आणि ZXi Plus मध्ये लॉंच केलेले आहे.ही कार गॅलेंट रेड, अल्लुरिंग ब्ल्यू, नटमेग ब्राऊन, ब्लुईश ब्लॅक, आर्कटिक व्हाईट, मॅग्मा ग्रे आणि स्प्लेंडिड सिल्व्हर सह सात रंगात उपलब्ध आहे. या कारची बुकींग सुरु झाली आहे. केवळ 11,000 रुपयांत ही कार बुक करता येते.
या कारच्या लुक आणि डीझाईनमध्ये अनेक बदल केलेले आहे. आधी कॉर्नरवर राऊंड शेप पाहायला मिळायचा आणि त्याला शार्प केलेले आहे. नवीन फ्रंट ग्रिल, रेक्टेंगुलर आणि शार्प एलईडी हेड लॅंप, नव्या डिझाईनचे फॉग लॅंम्प हाऊजिंग, चंकी ग्लॉस ब्लॅक ट्रीमने कारला आणखीन आकर्षक बनविले आहे.
नवीन डिझायर कारच्या पाठी मागील टेल लॅंपमध्ये वाय शेपची एलडीई लायटींग केली आङे. टेलगेटवर क्रोम स्ट्रीप दिली असून जी दोन्ही टोकाना जोडताना दिसत आहे. टॉप मॉडेलमध्ये डायमंड कट एलॉय व्हील देण्यात आले आहे. शार्प स्टायलिंग एलिमेंट्समुळे कारचे सध्याचे मॉडेल आधीच्या तुलनेत जास्त चांगले दिसत आहे.
सेफ्टी स्टार ?
क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटींग मिळणारी मारुती सुझुकी कंपनीची ही पहिली कार आहे.अलिकडे ग्लोबल NCAP द्वारा या कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली होती.यात नवीन डिझायरला 5 स्टार रेटींग मिळाली आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये सहा एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, ईबीडी सह एबीएस, ब्रेक असिस्ट, थ्री पॉइंट सिट बेल्ट स्टॅण्डर्ड, रिअर डिफॉगर आणि 360 डिग्री कॅमरा सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. वयस्कांसाठी कारला एकुण 34 गुणांपैकी 31.24 अंक मिळाले आहे. तर चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 39.0 अंक मिळाले आहेत.या बाबतीत कारला 4 स्टार रेटींग मिळाले आहे.
मायलेज किती ?
मारुती सुझुकी डिझायर मॅन्युअल व्हेरिएंट 24.79 किमी, ऑटोमेटिक वेरिएंट 25.71 किमी आणि सीएनजी व्हेरिएंट 33.73 किमी पर्यंत मायलेज देतील असे कंपनीने स्पष्ट केले आहे.15 इंचाच्या टायरवर धावणाऱ्या या सेडानकारमध्ये कंपनीने 37 लीटर पेट्रोल आणि 55 लिटरची सीएनजी टॅंक दिलेली आहे.पुढील चाकात डीस्क आणि पाठच्या चाकात ड्रम ब्रेकचा पर्याय मिळत आहे.
केबिन फिचर्स –
नवीन मारुती डिझायरचा केबिन आधीच्या मॉडेलच्या तुलनेत खूपच प्रिमियम आहे. यात सनरुफ, 9 इंचाचा इन्फोटेंमेंट सिस्टीम, रियर सेंटर आर्मरेस्ट, ऑटोमेटिक एसी, रियर एसी वेंट्स सारखे फिचर्स दिलेले आहेत. केबिनच्या जागेत स्पेस देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवाजात बॉटल होल्डर, मागच्या सिटवर सेंटर आर्मरेस्टसह कप होल्डर दिला आहे.