रॉयल एनफील्ड Interceptor 650 आणि Continental GT 650 चं नवं मॉडेल लाँच, किंमत…
रॉयल एनफील्डने आज 2021 Interceptor 650) आणि Continental GT 650 या दोन बाइक्सचं अपडेटेड व्हर्जन सादर केलं आहे.
मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनीने आज 2021 इंटरसेप्टर 650 (2021 Interceptor 650) आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 (Continental GT 650) या दोन बाइक्स अपडेट आणि रीफ्रेश कलर ऑप्शन्ससह लाँच केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स नवीन MiY पर्यायांसह उपलब्ध असतील, ज्यात ग्राहक त्यांच्या टेस्टनुसार मोटरसायकल पर्सनलाईज करू शकतात. नवीन MiY पर्यायांमध्ये सीट्स, सम्प गार्ड, टूरिंग मिरर, फ्लायस्क्रीन आणि बऱ्याच गोष्टींचा समाविष्ट आहे. (New model of Royal Enfield Interceptor 650 and Continental GT 650 Launched in India; know price, specs)
इंटरसेप्टर 650 (Interceptor 650) आता दोन नवीन स्टँडर्ड (सिंगल टोन) कलरवेजमध्ये उपलब्ध आहे, यामध्ये कॅनन रेड आणि व्हेंचर ब्लू या रंगांचा समावेश आहे. तसेच दोन नवीन कस्टम (डुअल टोन) कलरवेज- डाउनटाउन ड्रॅग आणि सनसेट स्ट्रिपही उपलब्ध आहे. यासह, मार्क 2 मध्ये ‘क्रोम’ वेरिएंटचं अपडेटेड व्हर्जनदेखील आहे. याशिवाय बाईकमध्ये सिंगल-टोन ऑरेंज क्रश आणि ड्युअल टोन बेकर एक्सप्रेसही उपलब्ध आहे.
पाच कलर ऑप्शन्ससह Continental GT 650 सादर
कॉन्टिनेंटल जीटी 650 कॅफे रेसर पाच नवीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. यात ब्रिटीश रेसिंग ग्रीन स्टँडर्डसह रॉकर रेड स्टँडर्ड (सिंगल टोन) देखील आहे. यासह, नवीन कस्ट (डुअल टोन) कलरवेज – डक्स डिलक्स आणि व्हेंटुरा स्टॉर्म आणि विद्यमान मिस्टर क्लीनचे ट्विक्ड क्रोम वेरिएंट देखील उपलब्ध आहेत.
रॉयल एनफील्ड Interceptor 650 ची किंमत
एकंदरीत, इंटरसेप्टर INT 650 सात रंग पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉन्टिनेंटल जीटी 650 मध्ये पाच नवीन थीम देण्यात आल्या आहेत. या बाईकच्या किंमतींबद्दल सांगायचे तर नवीन Interceptor 650 (Standard) ची किंमत 2,75,467 रुपये आहे, कस्टम कलरवेजची किंमत 2,83,593 रुपये आहे आणि क्रोम व्हेरियंट मार्क 2 ची किंमत 2,97,133 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
रॉयल एनफील्ड Continental GT 650 ची किंमत
Continental GT 650 च्या स्टँडर्ड कलरवेज बाइकची किंमत 2,91,701 रुपये, कस्टम-थीम असलेली बाईक 2,99,830 रुपये आणि क्रोम व्हेरिएंट मिस्टर क्लीनची किंमत 3,13,367 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आजपासून कंपनीने या दोन्ही बाईकचे बुकिंग सुरू केले आहे. वरील सर्व किंमती या एक्स-शोरुम किंमती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी यात थोडाफार फरक असू शकतो.
Presenting the 2021 #RoyalEnfieldTwins lineup with the #Interceptor650 and the #ContinentalGT650 reimagined in 12 expressions inspired by their rich cultural lineage.#PickYourPlay by visiting:https://t.co/NGKQDYkfdJ#ItsPlaytime #EasyGotBack #ATonOfFun #RoyalEnfield pic.twitter.com/gLPrRWnQEe
— Royal Enfield (@royalenfield) March 22, 2021
इतर बातम्या
Ducati, Suzuki, Yamaha ला टक्कर, नवी Ninja ZX-10R बाजारात, जाणून घ्या किमंत आणि फीचर्स
‘या’ आहेत देशातील टॉप 10 बाईक्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
Royal Enfield Himalayan ची चायनीज कॉपी बाजारात, Hanway G30 मध्ये काय आहे खास?
(New model of Royal Enfield Interceptor 650 and Continental GT 650 Launched in India; know price, specs)