Mahindra Scorpio : नवीन स्कॉर्पियोचे धमाकेदार सेफ्टी फीचर्स… Global NCAP वर किती रेटींग मिळणार?

महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या एसयुव्ही सेगमेंटमधील एक मॉडेल म्हणजे स्कॉर्पियो आहे. कंपनी याचे नवीन मॉडेल जूनमध्ये लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mahindra Scorpio : नवीन स्कॉर्पियोचे धमाकेदार सेफ्टी फीचर्स... Global NCAP वर किती रेटींग मिळणार?
महिंद्रा स्कॉर्पियोImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:35 AM

मुंबई : भारताच्या एसयुव्ही बाजारात एकहाती राज्य करणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पियोचे (mahindra scorpio) नवीन मॉडल लवकरच बाजारात दाखल होणार आहे. नवीन स्कॉर्पियो एक नवीन डिझाईनसह बाजारात येत आहे. कंपनीने केवळ आकर्षक लूकवरच फोकस केलाय, असं नाही. तर वापकर्त्याच्या सेफ्टीचाही (safety) पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार, कदाचित महिंद्रा स्कॉर्पियोला Global NCAP 5 रेटिंग (rating) मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे युर्जसच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतलेली दिसून येत आहे. स्कॉर्पियोचे हे नवीन मॉडल जूनपर्यंत दाखल होणार आहे.

सुरक्षेची पूर्ण खबरदारी

नवीन स्कॉर्पियोच्या एका टीझरमध्ये युजर्सच्या सेफ्टीबाबतची माहिती समोर आली आहे. टीझर पाहिल्यावर लक्षात येते की, कदाचित महिंद्रा स्कार्पियोला Global NCAP 5 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर नवीन स्कार्पियो वापरकर्त्यांसाठी सर्वाधिक सेफ्टी एसयुव्ही सिध्द होणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

स्कॉर्पियोच्या नवीन मॉडलच्या स्पेसिफिकेशन्सवर बोलायचे झाल्यास, या एसयुव्हीत ड्युअल बॅरेल हॅलोजनमध्ये हेडलँप देण्यात आलेले आहेत. नवीन स्कॉर्पियोचे इंटीरियर संपूर्णत: बदललेला दिसून येणार आहे. स्कॉर्पियोचे अपकमिंग मॉडेलचे इंटीरियर ड्युअल कलर टोनमध्ये येईल. याची थीम ब्लॅक/ब्राउन कलरमध्ये असेल. दरम्यान, फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास महिंद्राच्या नवीन स्कॉर्पियोमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आलेले आहेत. यात युजर्सना DRL, वायरलेस Android Auto, Apple CarPlay आणि Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहे. या शिवाय युजर्सना डिजिटल डिसप्लेदेखील मिळणार आहे, ज्यात टायर प्रेशर, दरवाजा उघडा आहे की बंद याबाबच्या सूचना, सीट बेल्ट सारखे अलर्ट मिळणार आहेत.

किंमत काय असेल?

नवीन स्कॉर्पियोला 2.2 लीटर डिझेल आणि 2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजीनसोबत लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय युजर्सना मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही व्हेरिएंट मिळणार आहे. याशिवाय महिंद्रा इलेक्ट्रिक सनरुफ, नवीन गिअर लीवर आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोलदेखील मिळणार आहे. याची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.