Suzuki Hayabusa 2021 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

मुंबई : Suzuki Hayabusa थर्ड जनरेशन बाईकची भारतभर डिलिव्हरी सुरू झाली आहे. किंमत जाहीर झाल्यानंतर या सुपरबाईकची पहिली बॅच काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात या बाईकच्या सर्व युनिट्सची विक्री झाली. दरम्यान आता या बाईकची दुसरी बॅच जुलै किंवा ऑगस्ट 2021 पर्यंत शोरूममध्ये दाखल होईल. या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 16.40 […]

Suzuki Hayabusa 2021 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?
2021 Suzuki Hayabusa
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 4:05 PM

मुंबई : Suzuki Hayabusa थर्ड जनरेशन बाईकची भारतभर डिलिव्हरी सुरू झाली आहे. किंमत जाहीर झाल्यानंतर या सुपरबाईकची पहिली बॅच काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात या बाईकच्या सर्व युनिट्सची विक्री झाली. दरम्यान आता या बाईकची दुसरी बॅच जुलै किंवा ऑगस्ट 2021 पर्यंत शोरूममध्ये दाखल होईल. या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 16.40 लाख रुपये इतकी आहे आणि त्यात विविध कॉस्मेटिक आणि यांत्रिक बदल करण्यात आले आहेत. ग्लोबल मॉडेलशी तुलना केली तर ही बाईक थोडी वेगळी आहे आणि तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. (new Suzuki hayabusa 2021 delivery started in India, check price and features)

नवीन Suzuki Hayabusa 2021 मध्ये 1300 सीसी, फोर-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड, DOHC, इनलाइन फोर इंजिन आहे. हे इंजिन 9,700 आरपीएम वर 187bhp पॉवर आणि 7,000 आरपीएम वर 150Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशन युनिटसह येतं. ही बाईक 18.5 kmpl इतकं मायलेज देते. या बाईकचं टॉप स्पीड 299 किमी प्रतितास इतकं आहे.

ही न्यू जनरेशन बाईक याआधीच्या मॉडेलपेक्षा 10bhp कमी पॉवरफुल आणि 5Nm कमी टॉर्क देणार आहे. त्याच वेळी, त्याचे वजन जुन्या मॉडेलपेक्षा 2 किलो कमी आहे. मोटरसायकलला नवीन लोगो डिझाइन दिलं गेलं आहे. तसेच रीडिझाइन केलेले टँक आणि क्रोम-प्लेटेडसारखे अनेक डिझाइन अपग्रेड्स प्राप्त झाले आहेत. 7 स्पोक अ‍ॅलोय व्हील्सनाही नवीन लुक देण्यात आला आहे. कंपनीने ही बाईक तीन ड्युअल टोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये कँडी बर्न गोल्ड विथ ग्लास स्पार्कल ब्लॅक, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू विथ कँडी डेअरिंग रेड आणि पर्ल ब्रिलियंट व्हाइट विथ मेटॅलिक मॅट स्वॉर्ड सिल्वर कलर्सचा समावेश आहे.

अपडेटेड मेकॅनिझम

या बाईकच्या सस्पेंशनबाबत बोलायचे झाल्यास 2021 Suzuki Hayabusa मध्ये अपडेटेड मेकॅनिझम देण्यात आलं आहे. यात ब्रिंबो स्टायल्मा कॅलिपर्स अप फ्रंट ब्रेक आणि ब्रिजस्टोन बॅटलॅक्स 22 टायर्स सारखे फीचर्स मिळतात, ज्यामुळे या बाईकचा परफॉर्मन्स अधिक वाढतो. या सुपरबाईकची लांबी 2180 मिमी, रुंदी 735 मिमी आणि उंची 1165 मिमी आहे. या बाईकचा व्हीलबेस जुन्या मॉडेलसारखाच 1480 मिमी इतका आहे.

जबरदस्त फीचर्स

या सुपरबाईकमध्ये नवीन सिक्स अॅक्सिस IMU आहे ज्यात 10 लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, 10 लेव्हल अँटी-व्हीली कंट्रोल, थ्री पॉवर मोड, लॉन्च कंट्रोल, थ्री लेव्हल इंजिन ब्रेक कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल क्रूझ आणि कॉर्निंग ABS यांचा समावेश आहे. या बाईकच्या फ्रंटला एलईडी हेडलॅम्प्स आणि मोठी विंडस्क्रीन देण्यात आले आहे. हेडलाईटच्या खाली ब्लॅक कॅडलिंग आणि ब्लॅक ORVMs मुळे ही बाईक अधिक स्पोर्टी दिसू लागली आहे. याशिवाय यामधील अन्य काही फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये नवीन सिमेट्रिकल ट्विन सायलेन्सर एग्जॉस्ट सिस्टम, LED टर्न इंडीकेटर्स, LED टेललॅम्प्स, एक मोठा डॅशबोर्ड आणि एक नवीन टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Dhoom सिनेमात जॉनने वापरलेली Hayabusa बाईक भारतात परतणार, स्पीडचा रेकॉर्ड किती?

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(new Suzuki hayabusa 2021 delivery started in India, check price and features)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.