प्रत्येक स्टेडियममध्ये ‘सफारी’चा जलवा, Tata Safari Gold एसयूव्ही IPL 2021 ची ऑफिशियल पार्टनर
टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही टाटा सफारी (All-New Tata Safari 2021) ही व्हिवो इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 ची अधिकृत भागीदार आहे.
दुबई : टाटा मोटर्सने सफारी रेंजमध्ये एक नवीन गोल्ड एडिशन जोडले आहे, जे दुबईत इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मध्ये सादर केले जाईल. टाटा सफारी गोल्ड एडिशनची किंमत 21.89 लाख रुपये आहे आणि ती एसयूव्ही व्हाइट गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. व्हाईट गोल्ड ड्युअल-टोन ब्लॅक अँड व्हाईटचा कॉन्ट्रास्ट ऑफर करते, जिथे आतील बाजूस हलका गोल्डन रंग असलेले मॉन्ट ब्लँक मार्बल फिनिश मिड पॅड आहे. दुसरीकडे, ब्लॅक गोल्डचं एक्टीरियर कॉफी बीनद्वारे प्रेरित आहे. दरम्यान, टाटा सफारीचं गोल्ड एडिशन सध्या आयपीएल सामन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. (New Tata Safari is Official Partner Of VIVO IPL 2021, Gold Edition of SUV will showcase in Stadiums)
टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही टाटा सफारी (All-New Tata Safari 2021) ही व्हिवो इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 ची अधिकृत भागीदार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (BCCI) टाटा कंपनीने सलग चौथ्या वर्षी भागीदारी केली आहे.
New Tata Safari सर्व स्टेडियम्सवर शोकेस केली जाणार
2018 पासून टाटा मोटर्स कंपनी आयपीएल स्पर्धेची अधिकृत भागीदार आहे. या अधिकृत भागीदार कंपनीने आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात चेन्नई, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद येथील स्टेडियमवर नवीन टाटा सफारी सादर केली होती. त्यानंतर आता यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात टाटा सफारीचं गोल्ड एडिशन दुबई, अबू धाबी आणि शाहजाहच्या मैदानात पाहायला मिळेल.
The reveal of the SAFARI #GOLD will turn the UAE Stadiums Glorious! Catch hold of its reveal at 7 pm today!
To Know More – https://t.co/YbC6arMIfV#SafariGold #ReclaimYourGame #VIVOIPL2021 #CSKvsMI pic.twitter.com/KSockRU1Ly
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) September 19, 2021
गोल्ड एडिशन भारतात लाँच
या एसयूव्हीच्या बाहेरील सर्व क्रोम इन्सर्ट्स आता गोल्ड हायलाइट्ससह बदलले गेले आहेत. बाजूला, दरवाजाचे हँडल गोल्डन कलरमध्ये आहेत आणि रूफ रेल्सवरही तेच हायलाइट्स दिसतात. सफारी आणि टाटाच्या मागील बॅजिंगलाही गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. मिड पॅड व्यतिरिक्त, दरवाजाच्या हँडलवर, एअर-कॉन व्हेंट्सच्या आसपास, इन्स्ट्रुमेंट पॅनेलची आउटलाइन आणि डॅशबोर्डवरील अंडरलाइनिंग गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. फीचर लिस्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 8.8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते जी iRA अॅप बेस्ड कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.
सहा व्हेरियंट्स
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
अशी आहे All New Tata Safari 2021
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स
हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
रूफ रेल्स
2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.
बॉस मोड
बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टियरिंग व्हील
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स
सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
सेफ्टी टच
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.
दमदार इंजिन
या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.
इतर बातम्या
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई
PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील
(New Tata Safari is Official Partner Of VIVO IPL 2021, Gold Edition of SUV will showcase in Stadiums)