Yamaha ची सर्वात स्वस्त Scooter लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) अलीकडेच देशात नवीन Fascino 125 Hybrid स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरच्या बेस ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 70,000 रुपये इतकी आहे.

Yamaha ची सर्वात स्वस्त Scooter लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Yamaha Fascino 125 Hybrid
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 4:33 PM

मुंबई : यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) अलीकडेच देशात नवीन Fascino 125 Hybrid स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरच्या बेस ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 70,000 रुपये इतकी आहे. कंपनीने एक डिस्क ब्रेक ट्रिमदेखील लाँच केलं आहे आणि त्याची किंमत 76,530 रुपये इतकी आहे (दोन्ही किंमती एक्स शोरूम दिल्लीतल्या आहेत) आऊटगोईंग मॉडेल्सच्या तुलनेत नवीन फॅसिनो हायब्रिड ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 2 हजार रुपयांनी स्वस्त आहे, तर डिस्क ब्रेक ट्रिमसाठी 1000 रुपये अधिक मोजावे लागतील. (New Yamaha Fascino 125 Hybrid launched with new features like SMG at less price)

जुलैच्या अखेरीस हे नवीन मॉडेल बाजारात लाँच होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. स्कूटरच्या सर्वात मोठ्या हाईलाइटबद्दल बोलायचे झाल्यास नवीन Yamaha Fascino 125 Hybrid मध्ये अतिरिक्त फंक्शनेलिटीसह स्मार्ट मोटर जेनरेटर (SMG) सिस्टम मिळते. जेव्हा स्टॉपपासून रायडर गाडी स्टार्ट करुन पॉवर असिस्ट देतो तेव्हा SMG एक इलेक्ट्रिक मोटर म्हणून काम करते, क्लायंबिंगदरम्यान ते फायदेशीर ठरते.

फीचर्स

नवीन Fascino 125 FI हायब्रिड 125 cc, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिनद्वारे संचालित आहे, जे 8 hp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करतं. नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलच्या 9.7 एनएमपेक्षा जास्त टॉर्क ऑफर करतं. या व्यतिरिक्त, स्कूटरला स्टँडर्ड साइड स्टॉप इंजिन कट-ऑफ स्विच मिळतो.

कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिस्क ब्रेक व्हर्जन व्हिव्हिड रेड स्पेशल, मॅट ब्लॅक स्पेशल, कूल ब्लू मेटॅलिक, डार्क मॅट ब्लू, सुवे कॉपर, यलो कॉकटेल, सायन ब्लू, व्हिव्हिड रेड आणि मेटॅलिक ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. दुसरीकडे, ड्रम ब्रेक ट्रिम विविध रंगांमध्ये जसे की विव्हिड रेड, कूल ब्लू मेटॅलिक, यलो कॉकटेल, डार्क मॅट ब्लू, सुवे कॉपर, सायन ब्लू आणि मेटलिक ब्लॅक मध्येदेखील उपलब्ध आहे.

Yamaha Fascino 125 Hybrid च्या डिस्क ब्रेक व्हर्जनमध्ये ब्लूटूथ इनेबल्ड Yamaha Motorcycle Connect X अॅप आणि ऑल-एलईडी हेडलँप, DRLs, LED टेल लँप्स आणि डिजिटल इंस्ट्रूमेंटेशनसारखे फीचर्स मिळतात.

इतर बातम्या

‘या’ तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर; आजपासून बुकिंग सुरु

सर्व इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकेल ही सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फिचर्सबद्दल

ब्लॅक, पिंक, लाइट ब्लूसह अनेक रंगांमध्ये Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, 499 रुपयांत बुकिंग करा

(New Yamaha Fascino 125 Hybrid launched with new features like SMG at less price)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.