नव्या बदलांसह Hyundai Creta पुढील आठवड्यात बाजारात, जाणून घ्या कशी आहे नवी कार

पुढील आठवड्यात इंडोनेशियामध्ये होणाऱ्या GIIAS 2021 ऑटो इव्हेंटमध्ये Hyundai आपल्य नेक्स्ट जनरेशन Creta SUV कारचे अनावरण करणार आहे. कंपनी अधिकृतपणे 11 नोव्हेंबर 2022 रोजी क्रेटा फेसलिफ्ट लाँच करेल.

नव्या बदलांसह Hyundai Creta पुढील आठवड्यात बाजारात, जाणून घ्या कशी आहे नवी कार
Next Gen Hyundai Creta
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 8:08 AM

मुंबई : पुढील आठवड्यात इंडोनेशियामध्ये होणाऱ्या GIIAS 2021 ऑटो इव्हेंटमध्ये Hyundai आपल्य नेक्स्ट जनरेशन Creta SUV कारचे अनावरण करणार आहे. कंपनी अधिकृतपणे 11 नोव्हेंबर 2022 रोजी क्रेटा फेसलिफ्ट लाँच करेल. यानंतर ही कार भारतासह इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल. कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन क्रेटा फेसलिफ्टची अधिकृत माहिती आधीच उघड केली आहे, यासोबतच एका ऑनलाइन लीक झालेल्या फोटोवरून कारच्या लूकची माहितीदेखील मिळते. (Next gen Hyundai Creta SUV will reveal on 11 november in GIIAS 2021 auto show)

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या इमेजमध्ये क्रेटा एसयूव्हीचा फ्रंट फेस कसा बदलला आहे हे पाहायला मिळतेय. 2022 Hyundai Creta नवीन ग्रिलसह येते, जी जागतिक बाजारपेठेत Tucson SUV मध्ये आधीच वापरली गेली आहे. पॅरामेट्रिक पॅटर्न असलेलं ग्रिल हे आगामी काळात SUVs साठी Hyundai चं नवीन सिग्नेचर डिझाईन असेल. यात LED हेडलाइट्स आणि LED DRLs देखील मिळतात, जे चालू केल्यावर बूमरँग सारखं डिझाईन तयार करतात. फॉग-लॅम्प केसिंग, जे आता बंपरच्या आत खोलवर ठेवलेले आहे, त्याला देखील नवीन डिझाइन मिळते.

नेक्स्ट जनरेशन क्रेटाचे खास फीचर्स

Hyundai Indonesia ने नवीन Creta SUV बद्दल आधीच माहिती दिली आहे. हे पॅनोरमिक सनरूफ, प्रीमियम साउंड सिस्टम तसेच अॅडव्हान्स्ड फीचर्ससह सुसज्ज 10.25 इंच TFT LCD क्लस्टरसह येईल. तसेच, यामध्ये एक कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आले आहे, जे युजर्सना त्यांच्या वाहनांना स्मार्टफोनद्वारे कनेक्ट करण्याची परवानगी देईल.

नेक्स्ट जनरेशन क्रेटाचे संभाव्य इंजिन

Hyundai च्या या आगामी कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 1.4 लीटर टर्बो इंजिनसह 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन दिले जाऊ शकते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाणे अपेक्षित आहे.

नेक्स्ट जनरेशन क्रेटा आणि कारचे इतर फीचर्स

भारतीय ऑटो मार्केटमध्ये क्रेटामधील बहुतेक प्रमुख वैशिष्ट्ये आधीच क्रेटामध्ये अस्तित्वात असताना, न्यू जनरेशन एसयूव्हीमध्ये ADAS फीचरदेखील जोडले जाईल. ब्राझीलमध्ये नुकतीच लॉन्च झालेली क्रेटा फेसलिफ्ट सादर करण्यात आली आहे. हे फीचर ड्रायव्हर असिस्टंट सिस्टमसह सुसज्ज आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलवर ब्लाइंड स्पोर्ट मॉनिटरिंग कॅमेरा डिस्प्ले आहे. तसेच, ड्रायव्हर्सच्या सपोर्टशिवाय टक्कर टाळण्यासाठी, ऑटोनॉमस ब्रेकिंग, लेफ्ट कन्व्हर्जन्स डिटेक्शन फीचर देण्यात आलं आहे, जे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाशी धोकादायक टक्कर होण्याचे संकेत देते.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Next gen Hyundai Creta SUV will reveal on 11 november in GIIAS 2021 auto show)

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.