Mahindra XUV 500 : नव्या ढंगात, नव्या रंगात, आली झोकात! महिंद्रा XUV 500 Coupe काय भारी लूक हाय राव
Mahindra XUV 500 : XUV 500 नावाला आता नवीन झळाळी मिळणार आहे. नवीन SUV लवकरच महिंद्राकडून बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे कार बाजारात आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. महिंद्राची नवीन कार अनेक ब्रँड्सला आव्हान देणार हे पक्कं..
नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : SUV कार सेगमेंटमध्ये अनेक खेळाडू एंट्री करत आहेत. काहींनी तर इलेक्ट्रिक एसयुव्हीची खेळी खेळली आहे. दणकट, दमदार वाहन निर्मिती यासाठी महिंद्रा ओळखल्या जाते. 2016 पासून महिंद्रा कार सेगमेंटमध्ये जोरदार धडका मारत आहे. कार बाजारात (Car Segment) महिंद्रा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. नाविन्यपूर्ण फीचर, आधुनिक तंत्रज्ञान आणि अस्सल देशी दणकटपणा असे समीकरण लवकरच कार प्रेमींना दिसेल. गेल्या काही दिवसांपासून महिंद्रा XUV 500 Coupe ची मोठी चर्चा होती. अखेर चेन्नईच्या रस्त्यावर या कारचा फर्स्ट लूक काहींनी मोबाईलमध्ये टिपलाच. त्यामुळे कार प्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. तर कार बाजारात वातावरण गरम झाले आहे. नव्या ढंगात, नव्या रंगात असलेली ही कार कशी असेल बरं?
नवा भिडू, नवीन राज्य
महिंद्रा कार सेगमेंटमध्ये सातत्याने प्रयोग करत आहे. तीव्र स्पर्धेत हटके ब्रँड सर्वसामान्य पोहचवण्यासाठी कंपनीने खास तायरी केली आहे. XUV500 हा ब्रँड अपडेट करण्यात येत आहे. त्यातूनच XUV 500 Coupe हा कार प्रेमींना नक्कीच वेड लावणार असे कंपनीला वाटते. नवीन आवतार कार प्रेमींना भूरळ घालणार असे कंपनीला वाटत आहे. एसयुव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta आणि Kia Seltos यांना ही नवीन एसयुव्ही टफ फाईट देणार असा एक्सपर्टचा दावा आहे.
नशीखांत ठेवली झाकून
2016 पासून Mahindra XUV 500 या सेगमेंटची चर्चा सुरु आहे. त्यात अनेक बदल झाले आहेत. आता Mahindra XUV 500 Coupe ही नवीन आवृत्ती पुढील वर्षी दाखल होऊ शकते. रस्त्यावरील चाचणीसाठी ही कार चेन्नई शहरातील रस्त्यावर धावली. नशीखांत सजवलेल्या या कारचे सर्वच फीचर आणि चेहरामोहरा समोर येऊ नये याची काळजी कंपनीने घेतली. या कारवर खास प्रकारचे आवरण टाकण्यात आल्याने कारचा रंग आणि फीचर समोर आले नाहीत.
किती सीटर
ही कार किती सीटरची असेल, असा प्रश्न कार प्रेमींना होता. तर ही कार 5 सीटर आहे. ही मीड साईज कॉम्पॅक्ट एसयुव्ही असेल. ही कार XUV300 आणि XUV700 या दरम्यानची खास फीचर असलेली कार असेल. Hyundai Creta आणि Kia Seltos या एसयुव्हीला ती टफ फाईट देईल.
कशी असेल कार
ही कार 5 सीटर आहे. तिची लांबी जवळपास 4.3 मीटर असेल. यापूर्वीच्या व्हर्जनप्रमाणेच दमदार इंजिन असेल. पेट्रोल आणि डिझेल असे दोन व्हेरिएंट असेल.
किंमत किती असेल
Mahindra XUV 500 Coupe ची किंमत किती असेल याविषयी वाहनप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कंपनीने अजून याविषयी अधिकृतपणे काहीच माहिती दिलेली नाही. एक्सपर्टनुसार, या एसयुव्हीची किंमत 11-19 लाख या दरम्यान असू शकते.
कोणा सोबत स्पर्धा
या एसयुव्ही सेगमेंटमध्ये सध्या दक्षिण कोरियाच्या कंपन्यांचा दबदबा दिसून येतो. या सेगमेंटमध्ये Maruti Grand Vitara आणि Toyota Hyryder ने नुकतीच एंट्री घेतली आहे. तर अगोदरच Volkswagen Taigun, Skoda Kushaa, Tata Curvv आणि Honda Elevate हे खेळाडू पण मैदानात आहेत.