Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एका चार्जवर पार करा 700 किलोमिटरचा रस्ता, BMW तयार करतेय दमदार इलेक्ट्रिक कार

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे, मारुतीपासून ते बीएमडब्ल्यूपर्यंत सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. अनेक कार उत्पादकांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारही सादर केल्या आहेत.

आता एका चार्जवर पार करा 700 किलोमिटरचा रस्ता, BMW तयार करतेय दमदार इलेक्ट्रिक कार
BMW-EV-car
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:25 PM

मुंबई : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे, मारुतीपासून ते बीएमडब्ल्यूपर्यंत सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. अनेक कार उत्पादकांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारही सादर केल्या आहेत. आता लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यू त्याची बीएमडब्ल्यू 3 सीरीज इलेक्ट्रिक कार तयार करत आहे, ही दमदार कार एकाच चार्जवर 400 किंवा 500 किलोमीटर नव्हे तर तब्बल 700 किलोमीटरची अंतर पार करु शकते. BMW च्या दमदार रेंन्जमुळे तुम्ही एकाच चार्जमध्ये दिल्लीहून लखनौला पोहचाल.

जर्मन कार उत्पादक BMW New NK (Neue Klasse) EV तयार करत आहे. या नवीन प्लॅटफॉर्मवर तयार होणारी पहिली EV कार सेडान असेल, ज्याचे कोडनेम NK1 असेल. ही आगामी EV नविन जनरेशन ची BMW 3 सिरीजची इलेक्ट्रिक आवृत्ती असेल. अशी माहिती गाडीवाडी नावाच्या वेबसाईटवरून प्राप्त झाली आहे.

आकर्षक लुक आणि दमदार फीचर्स

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली BMW 3 सिरीज लवकरच एक नवीन मॉडेल सादर करू शकते.BMW ही कंपनी आईसी इंजिन आणि ट्रान्समिशनऐवजी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन वापरेल. NK1 ची रचना वेगळी असेल, परंतु त्यातील काही घटक नेक्ट जनरेशन BMW 3 Next Generation BMW 3 Series सिरीज सारखे दिसू शकतात.

बीएमडब्ल्यू आगामी इलेक्ट्रिक कारसाठी

BMW ब्रँडची सहा जनरेशनची इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन NK 1 ला पॉवर करण्यासाठी वापरली जाईल, ज्यामध्ये कंपनी स्वतः बनवलेली इलेक्ट्रिक मोटर बसवणार आहे. कंपनीच्या मते, ही एक शक्तिशाली मोटर असेल त्यामुळे ती वीजचा जास्त वापर करेल. या प्लॅटफॉर्मवर 800 व्होल्टची बॅटरी वापरली जाईल, ज्याची चार्जिंग क्षमता 350 किलोवॅट असेल.बीएमडब्ल्यूच्या मते ही कार एकाच चार्जवर 700 किमीची ड्राइव्ह देऊ शकते, जी बाजारातील इतर कारच्या तुलनेत खूप जास्त आहे.

इतर बातम्या:

सिंगल चार्जवर 139 किमी रेंज, Okinawa ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak ला देणार टक्कर

अवघ्या 27 हजारात घरी न्या Suzuki Access 125, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

लॅपटॉपप्रमाणे कुठेही चार्ज करा, सिंगल चार्जवर 150km रेंज, भारताची पहिली AI इनेबल बाईक सादर

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.