सिंगल चार्जवर 1000 किमी रेंज, Tesla ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक सेडान सज्ज

| Updated on: Dec 21, 2021 | 4:40 PM

इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, लाँग ड्राईव्हवर जायचं असेल तर काय करायचं? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी निओ नावाची कंपनी पुढे आली आहे.

1 / 5
इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, लाँग ड्राईव्हवर जायचं असेल तर काय करायचं? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी निओ नावाची कंपनी पुढे आली आहे. वास्तविक, चीनी ईव्ही निर्माता कंपनी निओने त्यांच्या दुसऱ्या ऑल-इलेक्ट्रिक सेडान कारचे अनावरण केले आहे, या कारचे नाव निओ ईटी 5 असे आहे. (फोटो स्त्रोत : nio.com/et5)

2 / 5
कंपनीने आपल्या वार्षिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी All Electric ET 5 सादर केले आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून ही कार फक्त चीनमध्ये उपलब्ध होईल. या कारची सुरुवातीची किंमत 3,28,000 युआन (38,93,918 रुपये) ठेवण्यात आली आहे. एंट्री-लेव्हल टेस्ला मॉडेल 3 ची किंमत चीनमध्ये 30.36 लाख रुपये आहे. (फोटो स्त्रोत : nio.com/et5)

3 / 5
NIo ET 5 इलेक्ट्रिक सेडान समोरच्या बाजूला 150kWh पॉवर देते, तर मागच्या बाजूला 210kWh ची पॉवर दिली जाते. यानंतर, रायडर्सना एकूण 483 hp पॉवर आणि 700 Nm टॉर्क मिळते. अशा स्थितीत हे इंजिन 4.3 सेकंदात 0 ते 100 किमीपर्यंत वेग धारण करु शकतं. (फोटो स्त्रोत : nio.com/et5)

4 / 5
कंपनीने इनहाऊस 4 पीस फिक्स्ड क्लिपर्स विकसित केले आहेत, जे अॅल्युमिनियम कास्टिंगसह येतात. या कारच्या रेंजबाबत बोलायचे झाल्यास ही कार स्टँडर्ड 75kWh बॅटरीवर 550 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. (फोटो स्त्रोत : nio.com/et5)

5 / 5
लांब पल्ल्यासाठी 100kWh क्षमतेच्या बॅटरीसह ही कार 700 किमीपर्यंतची रेंज देते आणि 150kWh क्षमतेच्या बॅटरीसह ही कार सिंगल चार्जमध्ये 1000 किमीपर्यंत धावते. गिझ्नोचानाच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या कारमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 10.2 इंचाचा HDR डिस्प्ले मिळेल जो कारच्या डॅशबोर्डच्या मध्यभागी आहे. या कारमध्ये एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. (फोटो स्त्रोत : nio.com/et5)