इथेनॉल-बेस्ड फ्लेक्स इंजिनला भारतात लवकरच परवानगी, प्रतिलीटर 30-35 रुपयांची बचत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इथेनॉल बेस्ड प्रोडक्ट लाँच करण्याबाबत निवेदन देताना सांगितले की, ही योजना येत्या तीन महिन्यांत सुरू केली जाईल.

इथेनॉल-बेस्ड फ्लेक्स इंजिनला भारतात लवकरच परवानगी, प्रतिलीटर 30-35 रुपयांची बचत
Nitin Gadkari on Ethenol based flex engine,
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 3:36 PM

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. म्हणूनच बहुतेकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे प्रदूषणाबरोबरच खर्चही कमी होईल. यासह सरकार इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानही देत ​​आहे. दरम्यान, आता इथेनॉल बेस्ड व्हीकल्सदेखील लाँच करण्याचा सरकार विचार करीत आहे. सरकारने आता इथेनॉल बेस्ड ‘फ्लेक्स इंजिन’ला (Ethanol Based Flex Engines) परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी जीवाश्म इंधन वापरण्याऐवजी स्थानिक कृषी उत्पादनांचा वापर केला जातो. (Nitin Gadkari says India will Allow Ethanol Based Flex Engines In Vehicles, new scheme will Launch in next 3 months)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इथेनॉल बेस्ड प्रोडक्ट लाँच करण्याबाबत निवेदन देताना सांगितले की, ही योजना येत्या तीन महिन्यांत सुरू केली जाईल. गडकरी म्हणाले की, ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या जगातील अनेक देशांमध्ये फ्लेक्स इंजिन उपबल्ध आहेत, जी कृषी उत्पादनांवर (फार्म प्रोड्यूस) चालतात. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि टोयोटासारख्या कंपन्या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या विकासास प्रोत्साहनही देत ​​आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गेल्या आठवड्यात रोटरी जिल्हा परिषदेला (Rotary District Conference 2020-21) संबोधित करताना गडकरी म्हणाले होते की, पर्यायी इंधन इथेनॉलची (Ethanol) किंमत प्रति लीटर 60-62 रुपये इतकी आहे तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत (Petrol Price) प्रति लीटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरुन भारतीयांना प्रति लीटर 30 ते 35 रुपयांची बचत करता येईल.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल. केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते. परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.

गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1-1.5 टक्के इतकं होतं. ते म्हणाले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.

या देशांमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजिनाचं उत्पादन

ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉल (Bio-ethanol) वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

इथेनॉल म्हणजे काय?

इथॅनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

इतर बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय

वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी

(Nitin Gadkari says India will Allow Ethanol Based Flex Engines In Vehicles, new scheme will Launch in next 3 months)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.