डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे (diesel engine) उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे (diesel engine) उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिक परिषदेत (Siam Annual Conference) . संबोधित करताना गडकरी म्हणाले की, सरकार फ्लेक्सिबल सिस्टमवाल्या इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, जे ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल. (Nitin Gadkari urges vehicle makers to discourage diesel engines)
नितीन गडकरी म्हणाले की, “मी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री डिसकरेज करण्याचे आवाहन करतो. डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. ते म्हणाले, उद्योगाने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी संशोधन आणि विकास (आर अँड डी) वर खर्च केला पाहिजे.
E20 वाहनांच्या वापरावर जोर
केंद्रीय मंत्री म्हणाले की, उद्योगाने E20 ला अनुकूल वाहने जलद विकसित करण्याची अपेक्षा आहे. E20 वाहने म्हणजे इंधनात 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण.
गडकरी म्हणाले की, यामुळे आयात बिल कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. ते पुढे म्हणाले की, सरकारला हवे आहे की, भारताच्या जीडीपीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा सध्याच्या 7.1 टक्क्यांपेक्षा 12 टक्क्यांपर्यंत वाढला पाहिजे आणि रोजगाराच्या दृष्टीने या क्षेत्राचे योगदान सध्याच्या 37 मिलयन वरून 50 मिलयनपर्यंत वाढले पाहिजे.
देशाला अव्वल जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
गडकरी म्हणाले की, देशाला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात ऑटोमोबाईल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. आता भारतात अनेक बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह ब्रँड उपलब्ध आहेत आणि सरकार देशाला अव्वल जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाहन क्षेत्राचे योगदान 7.1 टक्के आहे, तर उत्पादन क्षेत्राच्या जीडीपीमध्ये वाहन क्षेत्राचा वाटा 49 टक्के आहे. वाहन उद्योगाची वार्षिक उलाढाल 7.5 लाख कोटी रुपये आहे आणि निर्यात 3.5 लाख कोटी रुपये आहे.
इतर बातम्या
Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज
देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार
(Nitin Gadkari urges vehicle makers to discourage diesel engines)