AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oben Rorr Electric Bike साठी बुकिंग सुरु, अवघ्या 999 रुपयांत करा बुकिंग

ओबेन रोर मोटरसायकल सुरुवातीच्या टप्प्यात 7 राज्यांमध्ये लाँच करण्यात आली आहे. या मोटरसायकलची टेस्ट ड्राइव्ह लवकरच सुरू होणार आहे. तसेच, बाईकची डिलिव्हरी जुलै 2022 पासून सुरू होऊ शकते.

Oben Rorr Electric Bike साठी बुकिंग सुरु, अवघ्या 999 रुपयांत करा बुकिंग
Oben Rorr Electric Two WheelerImage Credit source: obenev.com
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:00 AM

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये (Electric Two Wheeler Segment) ओबेन रोर (Oben Rorr) नावाच्या नवीन मोटरसायकलने दणक्यात एंट्री घेतली आहे. ही बाईक आता बुकिंगसाठी बाजारात उपलब्ध आहे. केवळ 999 रुपये भरून या बाईकचं बुकिंग करता येईल. EV स्टार्टअपने ऑफर केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची (Electric Bike) किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. बंगळुरू-आधारित EV स्टार्टअपचा दावा आहे की Rorr इलेक्ट्रिक मोटरसायकल सिंगल चार्जवर 200 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

ओबेन रोर मोटरसायकल सुरुवातीच्या टप्प्यात 7 राज्यांमध्ये लाँच करण्यात आली आहे. या मोटरसायकलची टेस्ट ड्राइव्ह लवकरच सुरू होणार आहे. तसेच, बाईकची डिलिव्हरी जुलै 2022 पासून सुरू होऊ शकते. या मोटारसायकलच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच आकर्षक दिसते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलला सर्व एलईडी हेडलॅम्प मिळतील जे एलईडी डेटाइम रनिंग लाईट्ससह येतील. ही मोटरसायकल ट्रिपल टोन कलरमध्ये येते.

ओबेन ईव्हीचा दावा आहे की ही लेटेस्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल पूर्णपणे भारतात बनविली गेली आहे आणि त्यात एरोडायनॅमिक डिझाइन आहे. या मोटरसायकलमध्ये ऑल -डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Oben Rorr मध्ये 4.4kWh क्षमतेची बॅटरी

Oben Rorr इलेक्ट्रिक मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी, 4.4kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10kW इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. हे पॉवरट्रेन 62 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने या बाईकसह 6 महिन्यांनी नवीन उत्पादन लाँच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

3 सेकंदात 0-40 किमी/तास स्पीड

ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 3 सेकंदात 0-40 किमी इतका वेग गाठते. या हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात इको, सिटी आणि हॅवॉक असे तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. या मोटरसायकलची बॅटरी अवघ्या 2 तासात पूर्ण चार्ज होते.

ही मोटरसायकल बाजारात रिव्हॉल्ट RV 400 शी स्पर्धा करेल. या बाईकची ड्रायव्हिंग आणि लूक अनेकांना आवडला आहे. या बाईकची किंमत 1.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

इतर बातम्या

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.