महिंद्राच्या अपकमिंग इलेक्ट्रिक कारचं लाँचिंग 15 ऑगस्टला
महिंद्राची इलेक्ट्रिक कारचे अधिकृत लाँचिंग 15 ऑगस्टला ब्रिटनमध्ये होणार असून त्यात कंपनीकडून यातील लेटेस्ट फीचर्स आणि टेक्नोलॉजीबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. यानंतर कंपनी एक्सयुव्ही 400 ची माहिती शेअर करणार आहे. 2027 पूर्वी दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही कार लाँच करण्याचे धोरण कंपनीकडून आखण्यात आले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindras) लवकरच आपल्या पाच इलेक्ट्रिक कार्सला (Eelectric car) समोर आणणार आहे. या सर्व कार्स 15 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक फोर व्हीलरच्या सेगमेंटमध्ये टाटाचा दबदबा कायम असून त्याच्यासमोर टिकून राहण्यासाठी महिंद्रा आणि दुसर्या कंपन्यांचे प्रयत्न सुरु आहेत. महिंद्राने आपली अपकमिंग एसयुव्ही कारचा (SUV car) लूक सर्वांसमोर आणला आहे. याबाबत कंपनीने स्वत: एक टीझरदेखील शेअर केले आहे. महिंद्राची ही अपकमिंग कार पाहून असे दिसतेय, की ही कार कुपे स्टाइलमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार, ही कार एक प्रकारची क्रोसओव्हर बॉडी टाइप सारखी कार असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. अपकमिंग कारचा लूक एसयुव्ही 700 सारखा असणार आहे. अद्याप या कारबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही
या इलेक्ट्रिक कारचे अधिकृत लाँचिंग 15 ऑगस्टला ब्रिटनमध्ये होणार असून त्यात कंपनीकडून यातील लेटेस्ट फीचर्स आणि टेक्नोलॉजीबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. यानंतर कंपनी एक्सयुव्ही 400 ची माहिती शेअर करणार आहे. 2027 पूर्वी दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही कार लाँच करण्याचे धोरण कंपनीकडून आखण्यात आले आहे.
ईव्हीसाठी वेगळ्या कंपनीची चाचपणी
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी नुकतेच भारतीय वाहन निर्माता कंपनीने ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसोबत भागीदारी केली आहे. ब्रिटेनच्या कंपनीने महिंद्राला 1925 कोटींचे इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक व्हीकलसाठी नवीन कंपनीचे सेटअप उभारण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समजते. महिंद्रा आपल्या इलेक्ट्रिक व्हीकलला तयार करणार्या कंपनीमध्ये एकूण 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक 2024 पासून 2027 पर्यंत असणार आहे. महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार्सना इग्लंडमधील महिंद्रा ॲडव्हान्स डिझाईन युरोपमध्ये डिझाईन केले जाणार आहे.
भविष्यातील मागणी
पेट्रोल व डिझेलचे दर आवाक्याबाहेर जात आहे. अशात ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. ग्राहकांचा कल ओळखून अनेक कार निर्मात्या कंपन्या आता आपली मोठी गुंतवणूक ईव्हीमध्ये करताना दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातील मागणी पाहून कार निर्मात्या कंपन्यांनी आपले विविध व्हेरिएंट इलेक्ट्रिक कार्समध्ये बाजारात आणले आहेत.