Indian Army: ‘या’ कारणामुळे भारतीय जवान झाले ओला स्कूटरवर स्वार; चीन सीमेपर्यंत करणार प्रवास
भारतीय लष्कराचे जवान आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर स्वार होउन चीनच्या सीमेपर्यंत लांबच्या प्रवासाला निघाले आहेत. 12 सैनिकांची ही टीम 8 जूनपर्यंत भारत-चीन सीमेवरील शिपकी-ला येथे आपली यात्रा संपवतील.
ओला इलेक्ट्रिकने भारतीय लष्कराच्या (Indian Army) सहकार्याने इलेक्ट्रिक स्कूटर रॅली (Ola Elctric Scooter Rally) सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथून हा 5 दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे. या रॅलीमध्ये सूर्य कमांडचे 12 जवान कसौली ते करचम, रोपा मार्गे 8 जून रोजी भारत-चीन सीमेवर शिपकी-ला (Shipki-La) पर्यंत पोहोचण्यासाठी शिपकी-ला समुद्रसपाटीपासून सुमारे 13,000 फूट उंचीवर आहे. या रॅलीचे नेतृत्व कॅप्टन व्ही. राणा करणार आहेत. लोकांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची उपयुक्तता वाढवणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात आपले योगदान देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा इलेक्ट्रिक स्कूटरने केलेला हा लष्कराचा पहिलाच प्रवास आहे.
393 किमी लांबचा प्रवास
12 सैनिकांची ही टीम Ola Scooter S1 Pro सह हा प्रवास पूर्ण करेल. कसौली ते शिपकी-ला ही टीम इलेक्ट्रिक स्कूटरने सुमारे 393 किमी अंतर कापणार आहे. ओला स्कूटरमध्ये कंपनीने नवीन MoveOS 2 ऑपरेटिंग सिस्टमचे बीटा अपडेट देणे सुरू केले आहे. या अपडेटनंतर कंपनीने रिव्हर्स गियर, स्लो स्पीड आणि मायलेजशी संबंधित समस्या दूर करण्याचाही प्रयत्न केला आहे. ओला स्कूटरच्या या प्रवासाबाबत कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनीही ट्विट केले आहे. या क्षणाला त्यांनी अभिमानास्पद म्हटले आहे. दरम्यान, 12 जवानांसह 3 ओला रायडर आहेत. अशा प्रकारे ही 15 जणांची टीम असेल.
ट्विट-
#IndianArmy #InStrideWithTheFuture An e-Scooter rally from Kasauli to Shipki La was flagged off by GOC-in-C, #SuryaCommand. The Surya Command Team led by Capt V Rana with 11 soldiers will traverse the tough terrain from Kasauli, Karcham, Ropa to Shipki La (13000 ft).@adgpi pic.twitter.com/YIk2r3fpH2
— SuryaCommand_IA (@suryacommand) June 2, 2022
काय म्हणाले भाविश अग्रवाल?
‘नुकत्याच ओला स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कंपनीच्या ब्रँड इमेजला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर कंपनीतील अनेक बडे अधिकारीही नोकरी सोडून गेले. यासोबतच ओला स्कूटरशी संबंधित अनेक तक्रारीही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. म्हणूनच कंपनी ब्रँड इमेज सुधारण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहे. हा देखील त्याचाच एक भाग असावा, अशी अपेक्षा आहे’.