ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट ड्राइव्हआधीच कंपनीचा हायपरचार्जर लाँच, अवघ्या 18 मिनिटात अर्धी बॅटरी चार्ज होणार
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली टेस्ट ड्राइव्ह दिवाळीनंतर सुरू होईल, पण त्याआधी कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. ओला इलेक्ट्रिकने पहिल्या हायपरचार्जरची घोषणा केली आहे.
मुंबई : ओला इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली टेस्ट ड्राइव्ह दिवाळीनंतर सुरू होईल, पण त्याआधी कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. ओला इलेक्ट्रिकने पहिल्या हायपरचार्जरची घोषणा केली आहे. ईव्ही कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ही माहिती दिली आहे. या चार्जरच्या मदतीने स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल. (Ola Electric inaugurates first hypercharger, battery will be 50 percent charged in 18 minutes)
कंपनीच्या प्रमुखांनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर लिहिले की पहिला @OlaElectric हायपरचार्जर लाँच झाला आहे. मॉर्निंग ट्रिपनंतर माझी एस 1 चार्ज करा. कंपनीने यापूर्वी घोषणा केली होती की, ते त्यांच्या ‘हायपरचार्जर’ सेटअप अंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी चार्जिंग सपोर्ट स्थापित करतील. 400 भारतीय शहरांमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त ठिकाणी/टचपॉईंटवर स्थापित केले जातील.
कशी आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटर?
स्कूटरचं बेस मॉडेल ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे.
S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
The first @OlaElectric Hypercharger goes live ? charging up my S1 after the morning trip ?? pic.twitter.com/MZFOXgDDEK
— Bhavish Aggarwal (@bhash) October 23, 2021
OLA इलेक्ट्रिक कार लाँच करणार?
ओला इलेक्ट्रिक कंपनीने नवीन एस 1 आणि एस 1 प्रो स्कूटरसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात पदार्पण केले आहे. भारतीय कंपनी आता इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी संकेत दिले आहेत की, ते इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. ओला कंपनी 2023 पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते, असे भाविश यांचे म्हणणे आहे.
Simple! pic.twitter.com/CSI9QQWibI
— Bhavish Aggarwal (@bhash) October 23, 2021
इतर बातम्या
Nissan Magnite च्या ग्राहकांना धक्का, कंपनीकडून ग्लोबल प्रोडक्शनमध्ये 30 टक्के कपात, जाणून घ्या कारण
Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स
(Ola Electric inaugurates first hypercharger, battery will be 50 percent charged in 18 minutes)