मुंबई : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) पुन्हा एकदा आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 (Ola Electric Scooter S1) आणि एस 1 प्रो (Ola Electric Scooter S1 Pro) ची बुकिंग सुरू केली आहे. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाईटवर 499 रुपयांमध्ये पुन्हा बुकिंग सुरू करण्यात आली आहे. (Ola Electric Re-Opens Electric Scooter Bookings)
सप्टेंबर 2021 मध्ये ओला इलेक्ट्रिकने फक्त दोन दिवसात 1,100 कोटींची विक्री जाहीर केली होती. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची पुढील खरेदी विंडो 1 नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा उघडेल. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाईन विक्री सुरू केली, जी 15 सप्टेंबर 2021 रोजी S1 आणि S1 Pro या दोन व्हेरिएंटवर सादर करण्यात आली होती. या बॅचची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये 1,000 शहर आणि निमशहरी भागांमध्ये सुरु होईल.
खरेदी विंडो बंद झाल्यानंतरही ग्राहक olaelectric.com ला भेट देऊन स्कूटर बुक करू शकतात. खरेदी विंडो दिवाळीच्या अगोदर 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा उघडली जाईल. या दुसऱ्या सेलमध्ये ओला एस 1 आणि एस 1 प्रो ची विक्री केली जाईल. एकट्या ओला स्कूटरने संपूर्ण दुचाकी उद्योगाने एका दिवसात जितकी कमाई केली आहे. हे दाखवते की, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी किती वेगाने वाढत आहे.
स्कूटरचं बेस मॉडेल ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे.
S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीने नवीन एस 1 आणि एस 1 प्रो स्कूटरसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात पदार्पण केले आहे. भारतीय कंपनी आता इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी संकेत दिले आहेत की, ते इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. ओला कंपनी 2023 पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते, असे भाविश यांचे म्हणणे आहे.
इतर बातम्या
डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही
MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स
(Ola Electric Re-Opens Electric Scooter Bookings)