Ola इलेक्ट्रिक S1 स्कूटरचा विक्रमी सेल, एका दिवसात 600 कोटींची विक्री
ओला इलेक्ट्रिक स्कूटरला (Ola Electric Scooter) भारतात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काल आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ची खरेदी विंडो उघडली होती.
मुंबई : ओला इलेक्ट्रिक स्कूटरला (Ola Electric Scooter) भारतात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काल आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ची खरेदी विंडो उघडली होती. दरम्यान, आता कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर आपल्या पहिल्या सेलचे आकडे जाहीर केले आहेत. त्यांनी सांगितले की, ओला इलेक्ट्रिक ई-स्कूटरच्या मदतीने कंपनीने 600 कोटींच्या विक्रीचा आकडा नोंदवला आहे. (Ola Electric sells S1 scooters worth over 600 crore rupees in one day)
ओला इलेक्ट्रिक आणि अग्रवाल यांनी बुधवारी रात्री जाहीर केले की, कंपनी खरेदी विंडो उघडल्यापासून प्रत्येक सेकंदाला आपल्या ई-स्कूटरचे चार युनिट विकत आहे. अग्रवाल पुढे म्हणाले की, युनिट्स लवकरच विकल्या जाऊ शकतात.
India is committing to EVs and rejecting petrol! We sold 4 scooters/sec at peak & sold scooters worth 600Cr+ in a day! Today is the last day, purchase will shut at midnight. So lock in this introductory price and buy on the Ola app before we sell out! https://t.co/TeNiMPEeWX pic.twitter.com/qZtIWgSvaN
— Bhavish Aggarwal (@bhash) September 16, 2021
फीचर्स
स्कूटरचं बेस मॉडेल ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे.
S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
Ola इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीत ‘महिला राज’
ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे महिला सर्व काम सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद. जर नसेल पाहिला तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण ओला (OLa) आपला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे. ओलाचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 10,000 हून अधिक महिलांना रोजगार दिला जाईल.
अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की ओला फ्यूचरफॅक्टरीचे संपूर्ण संचालन महिला करतील. ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला काम करतील. केवळ महिला कामगार असणारा हा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.” अग्रवाल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांची पहिली तुकडी दाखवण्यात आली आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 300 किमी रेंज, ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
अवघ्या 1.9 लाखात घरी न्या Maruti Swift, झिरो डाऊनपेमेंटसह ‘इतक्या’ महिन्यांची वॉरंटी
(Ola Electric sells S1 scooters worth over 600 crore rupees in one day)