मुंबई : ओला इलेक्ट्रिक कंपनी त्यांचं डिलीव्हरी नेटवर्क बंगळुरू आणि चेन्नई व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये विस्तारित करण्यासाठी सज्ज आहे. EV स्टार्टअपने जाहीर केले आहे की, ओला S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर आता पुढील आठवड्यापासून मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम सारख्या इतर शहरांमध्ये ग्राहकांना डिलिव्हरीसाठी उपलब्ध असतील. (Ola Electric to start delivery in new cities Like Mumbai and Pune)
ओला इलेक्ट्रिकने या महिन्याच्या सुरुवातीला 16 डिसेंबर रोजी आपल्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी सुरू केली, 15 ऑगस्ट रोजी लॉन्च झाल्यापासून जवळपास चार महिन्यांच्या विलंबानंतर. ईव्ही निर्मात्या कंपनीने बंगळुरू आणि चेन्नई येथे इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी पहिल्या 100 ग्राहकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले होते.
Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत, जिथे Ola S1 ची किंमत 99,999 रुपये इतकी आहे, तर Ola S1 Pro ची किंमत 1.29 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती
Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…
(Ola Electric to start delivery in new cities Like Mumbai and Pune)