Ola Electric Scooter चा भारतातील 1000 शहरांमध्ये रेकॉर्ड, 15 ऑगस्टला लाँचिंग

ओला इलेक्ट्रिकला (Ola Electric) भारतातील 1000 हून अधिक शहरांमधून त्यांची पहिली EV, Ola स्कूटरसाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.

Ola Electric Scooter चा भारतातील 1000 शहरांमध्ये रेकॉर्ड, 15 ऑगस्टला लाँचिंग
ola-scooter
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 5:45 PM

मुंबई : ओला इलेक्ट्रिकला (Ola Electric) भारतातील 1000 हून अधिक शहरांमधून त्यांची पहिली EV, Ola स्कूटरसाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले आहे की, कंपनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण भारतात आपली इलेक्ट्रिक स्कूटर आणि सेवा देईल. भारतात EV क्रांती सुरु झाली आहे. ते म्हणाले की, डिलिव्हरीच्या पहिल्या दिवसापासून, आम्ही संपूर्ण भारतात या स्कूटरचे वितरण करू आणि सेवा देऊ, 15 ऑगस्ट रोजी उर्वरित माहिती ग्राहकांसह शेअर केली जाईल. (Ola gets bookings from over 1000 Indian cities for their first electric scooter)

Ola Electric Scooter कंपनीच्या तामिळनाडू फॅसिलिटीमध्ये तयार केली जात आहे. ही फॅसिलिटी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर फॅसिलिटी असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यात एकूण 1 कोटी वाहने दर वर्षी तयार केली जातील. सुरुवातीला, देशांतर्गत मागणी पूर्ण केली जाईल आणि नंतर येथून त्याची लॅटिन अमेरिका, यूके, न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये निर्यात केली जाईल. ओलाची फ्युचर फॅक्टरी सुमारे 2400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधली जात आहे.

ब्लॅक, पिंक, लाइट ब्लूसह अनेक रंगांमध्ये लाँच होणार

कंपनीकडून या स्कूटरविषयी अद्याप फारशी माहिती सादर करण्यात आलेली नाही, परंतु हे स्पष्ट झाले आहे की, ही स्कूटर भारतात वेगवेगळ्या रंगात सादर केली जाणार आहे, ज्यामध्ये ब्लॅक, पिंक, लाइट ब्लू आणि व्हाइट रंगाचा समावेश असल्याची पुष्टी झाली आहे. ओलाच्या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती समोर आली आहे. अला अंदाज लावला जातोय की, येत्या आठवड्यात स्कूटर लाँच होऊ शकते, किंवा महिनाअखेपर्यंत स्कूटर लाँच होईल.

फक्त 499 रुपयांत बुक करा स्कूटर

अलिकडेच ओलाचे प्रमुख भाविश अग्रवाल यांनी ओलाच्या आगामी स्कूटरची काही वैशिष्ट्यांचा खुलासा केला होता. कंपनीच्या ग्रुप सीईओने नुकतीच ट्विटरवर जाहीर केले की, स्कूटरमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस, अ‍ॅप-आधारीत कीलेस एक्सेस आणि सेगमेंट-लीडिंग रेंज यासारख्या सुविधा असतील. स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपये खर्च करावे लागतील.

केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार

मागील दाव्यांनुसार, ओलाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचे सांगितले जाते. या दाव्यांना कोणताही आधार असल्यास स्कूटर अ‍ॅथर 450X आणि TVS iQube सह त्याच्या बर्‍याच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक रेंजला सपोर्ट करेल.

स्कूटर रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य

ज्या ग्राहकांनी आता ओला इलेक्ट्रिक स्कूटर आरक्षित (रिझर्व्ह) केली आहे त्यांना स्कूटरची डिलिव्हरी सुरु झाल्यावर प्राधान्य मिळेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 100-150 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि त्यात रिमूव्हेबल लिथियम-आयन बॅटरी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्लाऊड कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक सस्पेंशन अप फ्रंट आणि इतर बरेच फीचर्स मिळतील.

यापूर्वी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, स्कूटर मोठ्या अंडरसीट स्टोवेज, चांगलं एक्सीलरेशन आणि सेगमेंट-लीडिंग रेंज दाखवण्यात आली आहे. अर्थात, टेक्निकल एक्सपर्टीजबद्दल नेमके तपशील अद्याप जाहीर केले गेले नाहीत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन तमिळनाडूमधील ओला इलेक्ट्रिकच्या प्लांटमध्ये केले जात आहे. हा प्लांट इंडस्ट्रीच्या 4.0 स्टँडर्ड्सना पूर्ण करतो.

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत 15 टक्के स्कूटर करण्याचे लक्ष्य

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15 टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून या स्कूटरची निर्यातही कंपनीला करायची आहे. मे 2010 मध्ये 96 टक्के घट झाल्यामुळे ओला 1,400 कर्मचारी सोडत होते, तर ओला इलेक्ट्रिकने एम्स्टर्डममधील इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी एटरगो बीव्हीला स्कूटरची लाइन लाँच करण्यासाठी विकत घेतले होते.

2017 मध्ये झाली ओला इलेक्ट्रिकची स्थापना

ओला इलेक्ट्रिकची स्थापना 2017 मध्ये झाली आणि 2019 मध्ये कंपनीने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला, जो सर्वात वेगवान भारतीय युनिकॉर्न बनला. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, सॉफ्टबँक, टाटा सन्स, मॅट्रिक्स पार्टनर्स, ह्युंडाई मोटर आणि याची सहाय्यक कंपनी किया मोटर्स या कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे 307 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. युनिकॉर्न ही एक खासगी कंपनी आहे ज्याची किंमत 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(Ola gets bookings from over 1000 Indian cities for their first electric scooter)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.