Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 चं उत्पादन बंद, ग्राहकांसमोर केवळ S1 Pro चा पर्याय

ओला इलेक्ट्रिकने आपल्या सर्वात स्वस्त ई-स्कूटर S1 चे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व S1 ग्राहकांना याबाबत माहिती देणारा ईमेलही पाठवला आहे.

Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 चं उत्पादन बंद, ग्राहकांसमोर केवळ S1 Pro चा पर्याय
OLA Eelectric Scooter
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 5:28 PM

मुंबई : ओला इलेक्ट्रिकने आपल्या सर्वात स्वस्त ई-स्कूटर S1 चे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व S1 ग्राहकांना याबाबत माहिती देणारा ईमेलही पाठवला आहे. कंपनीने संभाव्य S1 खरेदीदारांना पाठवलेल्या ईमेलनुसार, कंपनी हे व्हेरिएंट बनवणे थांबवेल. ओलाचा दावा आहे की, त्यांच्या बहुतेक ग्राहकांनी अधिक महाग असलेलं आणि लोडेड व्हेरिएंट S1 Pro (Ola S1 Pro) खरेदी केले आहे. ग्राहकांची पसंती एस 1 प्रो या स्कूटरला जास्त आहे, त्यामुळे कंपनी उत्पादन लाइनमध्ये त्या व्हेरियंटला प्राधान्य देत आहे.

S1 ग्राहकांना S1 Pro वर अपग्रेड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे, परंतु यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. मात्र, तरीही ग्राहकांना S1 व्हेरिएंटच घ्यायचं असेल तर त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. ज्यांनी बेस-स्पेक S1 बुक केली आहे ते अपग्रेड पर्यायाची निवड करू शकतात. 21 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता ओला अॅपवर अंतिम पेमेंट विंडो उघडेल तेव्हा ग्राहक या पर्यायाची निवड करु शकतात.

ओलाने ई-स्कूटर S1 चे उत्पादन थांबवले

ई-स्कूटर निर्मात्या कंपनीची ही नवीन डेव्हलपमेंट अशा खरेदीदारांसाठी योग्य नाही ज्यांनी ईव्ही पाहिल्याशिवाय किंवा अनुभवल्याशिवाय ब्रँडवर विश्वास ठेवला होता. या ग्राहकांनी महिनोन्महिने वाट पाहिली आणि आता या बातमीनंतर ओलाच्या ग्राहकांच्या विश्वासाला तडे जाऊ शकतात. ओलाचे हे वर्तन चुकीचे आहे. ग्राहकांचं म्हणणं आहे की, कंपनीने योग्य वेळी S1 व्हेरिएंटसाठी बुकिंग घेणे बंद करायला हवे होते, तसेच उत्पादन बंद करण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी एस 1 ई स्कूटर बुक केली आहे, त्यांना वाहन डिलीव्हर करायला हवे होते.

OLA कडून ग्राहकांना ईमेल

ग्राहकांना त्यांच्या स्कूटरच्या होम डिलिव्हरीसाठी डिस्पॅचनंतर 10 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. हा कालावधी एखाद्या विशिष्ट शहरातील ग्राहकाचे स्थान आणि आरटीओच्या आवश्यकतेवर अवलंबून असेल. S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीदारांना पाठवलेल्या ईमेलनुसार, खरेदीदारांना त्या व्हेरिएंटचे उत्पादन पुन्हा सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा पर्याय आहे.

S1 साठी उत्पादन पुन्हा सुरू होताच ग्राहकांना सूचित केले जाईल. त्यानंतर ते अंतिम पेमेंट करू शकतात. S1 खरेदीदारांसाठी दुसरा पर्याय म्हणजे ते बुकिंग रद्द करू शकतात. हे ओला अॅपवर किंवा त्यांच्या customer support team शी संपर्क साधून ते बुकिंग रद्द करु शकतात.

इतर बातम्या

3 लाखांहून कमी किंमतीत 5 गाड्या, मारुती वॅगनआरसह चांगले पर्याय उपलब्ध

आता 8 सीटर गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य, लवकरच नियम लागू होणार

प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक

(Ola S1 electric scooter production discontinued, forced to upgrade to S1 Pro alleges customers)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.