OLA S1 Air Sale : OLA ची जादू पुन्हा! इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धुमाकूळ, मिळतील हे फीचर्स
OLA S1 Air Sale : OLA ची जादू पुन्हा चालणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी OLA S1 Air सज्ज झाली आहे. या दिवशी ही स्कूटर बाजारात येत आहे. किती आहे किंमत?
नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : ओलाचे गारुड अजून ही इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये (Electric Vehicle Segment) कायम आहे. बेंगळुरुच्या या कंपनीची OLA S1 Air ही स्कूटर बाजारात येऊ घातली आहे. ही स्कूटर बाजारात धुमाकूळ घालेल असा एक्सपर्टचा दावा आहे. गेल्या वर्षी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने प्री-लाँच बुकिंग सुरू केल्याच्या अवघ्या 24 तासांत 1 लाखांचं बुकिंग नोंदवलं होतं. हा कंपनीसाठी हा सुखद धक्का होता. पण नंतर डिलिव्हरीमध्ये होणारा विलंब आणि ब्रँडमधील तांत्रिक चुकांमुळे ओलाच्या वाहनांवर ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी या कंपनीच्या स्कूटरला आग लागण्याच्या घटना ही घडल्या होत्या. त्यानंतर कंपनीने अनेक बदल केले. आता OLA S1 Air ही स्कूटर बाजारात या दिवशी धुमाकूळ घालणार आहे.
सवलतीत खरेदी करा स्कूटर
ओला कंपनीची एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्यात येणार आहे. 28 जुलै 2023 रोजीपासून ही स्कूटर बाजारात दाखल होत आहे. ग्राहकांना सवलतीत ही स्कूटर खरेदी करता येईल. त्यासाठी 30 जुलै 2023 रोजीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
असा होईल फायदा
31 जुलै रोजीनंतर ई-स्कूटर खरेदी केल्यास, इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 1,19,999 रुपये एक्स-शोरूम किंमत चुकती करावी लागेल. ही स्कूटर ओला कम्युनिटीवर अगोदर बुक करता येईल. 28 जुलै पूर्वी स्कूटरची बुकिंग करता येईल. ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यांना 1,09,999 रुपये एक्स-शोरूम किंमत मिळेल. याविषयीची माहिती ट्विटर हँडलवर कंपनीने दिली आहे.
काय आहेत फीचर
ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही स्कूटर 125 किमी गतीने धावण्याचा दावा करण्यात आला आहे. याची उच्चांकी गती 90 किमी/तास अशी आहे. यामध्ये एक हब मोटर आहे. त्याला ओला हायपरड्राइव मोटर असे म्हणतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर 11.3 HP ची पॉवर आणि 58 NM का पीक टॉर्क देण्यास ही स्कूटर सक्षम आहे.
The all-new versatile S1 Air is coming on 28th July #EndICEage https://t.co/86zf0oOpOu
— Ola Electric (@OlaElectric) July 21, 2023
या सुविधा पण
ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक एलईडी हँडलँप, 7.0 इंच TFT स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिविटी, रिव्हर्स मोड, OTA अपडेट, रिमोट बूट लॉक/अनलॉक आणि म्युझिक प्लॅबॅकची सुविधा पण त्यात आहे.
तीन रायडिंग मोड
या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड आहे. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोड आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोनो-शॉकचा वापर नाही. तर पुढील चाकामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील चाकात ट्विन-शॉक एब्जॉर्बर असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरने 5,00,000 किमी हून अधिकची चाचणी केल्याची माहिती दिली आहे.
बाजारातील स्पर्धक
ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात हिरो ऑप्टिमा, ओकिनावा प्रेज प्रो या सारख्या इलेक्ट्रिक स्क्टूरशी स्पर्धा करेल.