मुंबई : Realme नंतर, OnePlus ने ऑटो सेगमेंटसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. अलीकडेच स्मार्टफोन निर्माता ब्रँड Realme ने भारतात ऑटोमोटिव्ह श्रेणीमध्ये ट्रेडमार्क भरला आहे आणि आता OnePlus ने हे पाऊल उचलले आहे. रशेल लेन यांनी ही माहिती दिली आहे. OnePlus हा भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन आहे आणि अलीकडेच त्यांनी अप्पर आणि मिड रेंज श्रेणीचे स्मार्टफोन देखील सादर केले आहेत. (OnePlus Electric Cycles, Scooters, Autonomous Cars will be launched, Trademarked In India)
OnePlus स्मार्टफोन भारत आणि आशियाई देशांसह यूके आणि अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत आणि अशा परिस्थितीत अनेक लोक OnePlus च्या इलेक्ट्रिक वाहनाकडे आकर्षित होतील असा विश्वास कंपनीला आहे. मात्र, स्मार्टफोननंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत ग्राहक वनप्लसवर विश्वास ठेवतील की नाही, हे येणारा काळच सांगेल. वास्तविक, अनेक मोठ्या कंपन्या भारतात त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्या आणि त्यांच्या वाहनांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. Realme आणि OnePlus च्या मूळ कंपनीचे नाव BBK Electronics असे आहे.
कंपनीच्या वतीने निवेदन जारी करून असे सांगण्यात आले आहे की, वनप्लस ऑटोमोटिव्ह सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची संधी शोधत आहे. यावर ही कंपनी बऱ्याच दिवसांपासून संशोधन करत होती. कंपनीने 2019 मध्ये Warp Car नावाच्या इलेक्ट्रिक सुपरकारचा टीझर त्यांच्या वेबसाइटवर जारी केला होता, जो 1 एप्रिल रोजी देखील शेअर केला गेला होता, मात्र मीडिया कंपन्यांनी ही एक गंमत म्हणून याबाबतच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. पण आता असे म्हणता येईल की, हा विनोद नव्हता. कारण वनप्लस प्रत्यक्षात कार बनवत आहे.
OnePlus Warp कारचे स्पेसिफिकेशन पूर्वी शेअर केले गेले आहेत. ही कार केवळ 3 सेकंदात 0-60mph इतका वेग पकडू शकेल. जुन्या माहितीनुसार, ही कार सिंगल चार्जमध्ये सुमारे 467 किमी अंतर कापण्यास सक्षम असेल. ही कार अवघ्या 20 मिनिटांत चार्ज होऊ शकते. याच्या कॉकपिटमध्ये कार्बन फायबर वापरण्यात येणार आहे. तथापि, ट्रेडमार्क अॅप्लिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. तसेच ही कार कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जुन्या माहितीनुसार, कंपनी OnePlus इलेक्ट्रिक सायकल आणि ड्रायव्हरलेस कार लॉन्च करू शकते.
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(OnePlus Electric Cycles, Scooters, Autonomous Cars will be launched, Trademarked In India)