Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus: वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोनची माहिती लिक… 50MP कॅमेरा आणि 150W चार्जिंगसह दमदार फीचर्स

वनप्लसकडून लवकरच आपला अपकमिंग स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचे नाव OnePlus 10T असेल. एका माहितीनुसार, हा अपकमिंग स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग आणि 50MP मेन लेंससह लाँच केला जाऊ शकतो. टिपस्टर पारस गुगलानी यांनी याबाबतची अधिक माहिती शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी येईल, अशी अपेक्षा आहे.

OnePlus: वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोनची माहिती लिक... 50MP कॅमेरा आणि 150W चार्जिंगसह दमदार फीचर्स
OnePlus 10TImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 2:54 PM

वनप्लस (OnePlus) लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने नुकतेच नॉर्ड 2 टी (Nord 2T) बाजारात आणले आहे. कंपनी आणखी एक टी-सीरीज फोन आणत असल्याचे विश्‍वसनीय माहिती आहे. हा नवीन स्मार्टफोन वनप्लस 10 टी (OnePlus 10T) असण्याची शक्यता असून त्याच्या लाँच तारखेबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. लिक झालेल्या माहितीनुसार या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येउ शकतो. हा स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याची मेन लेंस 50MP असेल. टिपस्टर पारस गुगलानी यांनी याबाबतची अधिक माहिती शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी येईल, अशी अपेक्षा आहे.

कुठे मिळेल स्मार्टफोन?

हा स्मार्टफोन भारतात अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. एका माहितीनुसार स्मार्टफोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हँडसेटचे लीक झालेले रेंडर पंच होल कटआउटसह डिसप्ले दिसून येत आहे. फोन अलर्ट स्लाइडरशिवाय लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन भारतात 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

काय असतील स्पेसिफिकेशन्स?

OnePlus 10T स्मार्टफोन OxygenOS 12 सह लाँच केला जाऊ शकतो. यात 6.7 इंचाचा फुल HD + AMOLED डिसप्ले मिळून तो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याची प्राथमिक लेंस 50MP ची असू शकते. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस मिळू शकतात. फ्रंटमध्ये कंपनी 16MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4800mAh बॅटरी दिली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. सेफ्टीसाठी कंपनी यात फिंगरप्रिंट सेंसर देईल. हँडसेटची रचना OnePlus 10 Pro सारखीच असेल.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.