बजाज चेतकची दमदार एंट्री, नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सूसाट धावणार

Bajaj Chetak Electric Scooter | बजाजची नवी इलेक्ट्रिक स्कूटर Chetak Urbane नवीन फीचर, रेंजसह बाजारात दाखल झाली आहे. यामध्ये तुम्हाला Chetak Premium स्कूटर पेक्षा अधिक फीचर मिळतील. बजाजच्या चेतकने कधीकाळी भारतीयांवर गारुड घातले होते. चेतक हा भारताचा दुचाकीमधील सर्वात लोकप्रिय ब्रँड होता.

बजाज चेतकची दमदार एंट्री, नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सूसाट धावणार
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 3:18 PM

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : बजाजने भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Bajaj Chetak Urbane’ लाँच केले आहे. कंपनीने लोकप्रिय चेतक हा ब्रँड पुन्हा नव्या दमाने बाजारात उतरवला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे हे लेटेस्ट मॉडल आहे. यामध्ये तुम्हाला फीचर आणि रेंज मिळेल. यापूर्वीच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा यामध्ये बदल दिसले. इलेक्ट्रिक टू व्हीलरने या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिएंट Standard आणि Tecpac सह बाजारात उतरवले आहे. या स्कूटरचा बेसिक मॉडेल प्रीमियमच्या अगदी जवळपास आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये काही बदल केले आहेत. तर काही अपेक्षित बदल केले नाहीत.

चेतकची ब्रेकिंग

बजाज चेतकच्या नवीन मॉडलमध्ये सर्वात मोठा बदल झाला तो रेंजमध्ये. सिंगल चार्जमध्ये सध्याच्या मॉडलपेक्षा ते अधिक रेंज देईल. ब्रेकिंगमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. Chetak Urbane मध्ये दोन्ही बाजूंनी ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. तर प्रीमियम व्हर्जनमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. जाणून घेऊयात चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये…

हे सुद्धा वाचा

Bajaj Chetak Urbane: बॅटरी आणि रेंज

चेतकच्या नवीन मॉडेलमध्ये 2.88 kWh बॅटरी पॅकची पॉवर ताकद देण्यात आली आहे. Chetak Premium मध्ये पण इतकीच बॅटरी देण्यात आली आहे. नवीन बजाज चेतकची रेंज वाढली आहे. आता फुल चार्जमध्ये चेतक स्कूटर 113 किलोमीटरचे अंतर कापेल. तर दुसरीकडे सिंगल चार्जमध्ये प्रीमियम व्हर्जनची रेंज 108 किलोमीटर आहे.

असा आहे टॉप स्पीड

चेतक अर्बनचे दोन व्हेरिएंट फुल चार्ज होण्यासाठी 4 तास 50 मिनिटे लागतील. चेतक अर्बनचा सर्वाधिक वेग ताशी 73 किलोमीटर आहे. तर प्रीमियम व्हर्जन ताशी 63 किलोमीटर आहे. नवीन स्कूटरचा वेग सर्वाधिक आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये केवळ इको रायडिंग मोड आहे. त्याची एप कनेक्टिव्हिटी मर्यादीत आहे.

या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत काय

Chetak Urbane च्या स्टँडर्ड इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1,15,001 रुपये आहे. तर Tecpac व्हेरिएंटसाठी 1,12,001 रुपये अशी एक्स शोरुम किंमत आहे. बजाज चेतकच्या प्रीमियम व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 1,15,000 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...