8 लाख वाहनांनी थकवला राज्याचा कोट्यवधींचा कर; करचुकवेगिरीत पुणे अव्वल!

एकट्या पुणे आरटीओ अंतर्गत 1 लाख 12 हजार 569 वाहनं कर न भरता धावत आहेत.

8 लाख वाहनांनी थकवला राज्याचा कोट्यवधींचा कर; करचुकवेगिरीत पुणे अव्वल!
लाखो वाहनांनी चुकवला कोट्यवधींचा कर
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 1:54 PM

मुंबई : राज्यात तब्बल 8 लाख 77 हजार वाहनं कर न भरता रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वाहनांनी राज्य परिवहन विभागाचा कोट्यवधींचा कर थकवल्याचं समोर येत आहे. या थकीत कर वसुलीसाठी परिवहन विभागाने आता कार्यवाही सुरू केली आहे. (over 8 lakhs vehicles in the Maharashtra have not paid tax of crores of rupees to the transport department)

कोट्यवधींचा कर थकला!

आरटीओत नोंदणी केलेल्या व्यावसायिक (ट्रान्स्पोर्ट) वाहनांकडून दर 3 महिन्यांनी किंवा वार्षिक कराचा भरणा केला जातो. तर नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांकडून नोंदणीच्या वेळी एकरकमी करभरणा करून घेतला जातो. पण असं असलं तरी राज्यात तब्बल 8 लाख 77 हजार 904 वाहनांनी हा करच भरला नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत जाणारा कोट्यवधींचा टॅक्स जमा झालेला नाही.

कर चुकवेगिरीत पुणे अव्वल!

सर्वाधित कर चुकवलेल्या शहरांच्या यादीच पुण्याचा नंबर पहिला आहे. एकट्या पुणे आरटीओ अंतर्गत 1 लाख 12 हजार 569 वाहनं कर न भरता धावत आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवड, ठाणे या कार्यालयांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे या वाहनांकडे कराची थकबाकी आहे.

परिवहन विभागाची कार्यवाही सुरू

परिवहन विभागाची सध्याची आर्थिक स्थिती पाहाता ही थकीत करवसुली करण्यासाठी परिवहन विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. कर न भरलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयात ‘वायुवेग पथके’ कार्यरत आहेत. मात्र, कर थकवलेल्या वाहनांची लाखोंची संख्या पाहाता या पथकांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. (over 8 lakhs vehicles in the Maharashtra have not paid tax of crores of rupees to the transport department)

हेही वाचा:

साडी-चोळी, सोन्याचे दागिने; महिला शिपायाचा निरोप समारंभ, उपअधीक्षकांनी गाडी चालवत ढोरे मावशींना घरी सोडलं

पार्टीत दारु ढोसली, नंतर वाद, एकाची चाकू भोसकून हत्या, मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न

क्रेडिट कार्डचे हप्ते थकले, महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.