AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, ‘या’ कारणामुळे सर्वच वाहन कंपन्या तोट्यात

भारतीय वाहन उद्योग (ऑटोमोबाईल इंडस्ट्री) लॉकडाऊनमधून नुकताच बाहेर आला आहे. काही वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, 'या' कारणामुळे सर्वच वाहन कंपन्या तोट्यात
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:27 AM

मुंबई : भारतीय वाहन उद्योग (ऑटोमोबाईल इंडस्ट्री) लॉकडाऊनमधून नुकताच बाहेर आला आहे. काही वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु सध्या सप्लाय डिमांडबाबत एक समस्या निर्माण झाली आहे. कारण वाहन उत्पादक कंपन्यांना कमी प्रमाणात स्टील आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरु आहे. त्यामुळे भारतीय वाहन उत्पादकांना सातत्याने सेमीकंडक्टरची कमतरता भासतेय. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यांचे उत्पादन कमी होत आहे. (passenger vehicle retail sales dip 4 pc in Jan as semiconductor shortage)

ऑटोमोबाईल डीलर्सची संघटना फाडाने (FADA – Federation of Automobile Dealers Associations) मंगळवारी सांगितले की, सेमीकंडक्टरअभावी जानेवारी 2021 मध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 4.46 टक्क्यांनी घसरून 2,81,666 वाहनांवर आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जानेवारी 2020 मध्ये त्यांनी 2,94,817 वाहनांची विक्री केली होती.

एफएडीए 1,480 प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) 1,273 वाहन नोंदणीबाबतचा डेटा गोळा करते. एफएडीएच्या म्हणण्यानुसार, दुचाकी विक्री 8.78 टक्क्यांनी घसरून 11,63,322 वाहनांची नोंद झाली आहे, मागील वर्षी याच कालावधीत 12,75,308 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. या कालावधीत व्यावसायिक वाहनांची विक्री 24.99 टक्क्यांनी घसरून 55,835 वाहनांवर आली आहे, मागील वर्षी याच कालावधीत 74,439 वाहनांची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात तीन चाकी वाहनांची विक्री 51.31 टक्क्यांनी घसरून 31,059 वाहनांवर आली. तथापि, ट्रॅक्टरच्या विक्रीत 11.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागणीबाबतचा अंदाज बांधण्यात चूक

विक्रीच्या आकडेवारीवर भाष्य करताना एफएडीएचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले की, लॉकडाऊननंतर ऑटो उद्योगाने ग्राहकांच्या मागणीबाबतचा अंदाज बांधण्यात चूक केली आहे हे स्पष्ट झाले आहे, तसेच सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन विक्री घटली आहे. त्यातही प्रामुख्याने प्रवासी वाहनांना मोठा फटका बसला आहे.

सेमीकंडक्टर्स म्हणजे काय?

सेमीकंडक्टर्स सिलिकॉन चिप आहे जी ऑटोमोबाइल, कंप्यूटर आणि मोबाईलपासून अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये नियंत्रण आणि मेमरीसंबंधित कार्य पूर्ण करते. ऑटो इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सेमीकंडक्टर्सचा वापर वाढला आहे. वाहनांमधील नवीन फीचर्स जसे की, ब्लूटूथ कनेक्टिविटी, चालक-सहाय्य, नेव्हिगेशन आणि हायब्रीड-इलेक्ट्रिक सिस्टमसाठी सेमीकंडक्टर्सचा वापर केला जातो.

हेही वाचा

Mahindra Thar प्रेमींसाठी वाईट बातमी, उत्पादन मंदावलं, वेटिंग पिरियड वाढणार?

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लाँच होणार रेनॉ Kiger, डीलर्सकडून बुकिंग सुरु

अवघ्या 6 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात

(passenger vehicle retail sales dip 4 pc in Jan as semiconductor shortage)

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.