मुंबई : फोक्सवॅगनने पोलो कम्फर्टलाइन TSI (Volkswagen Polo 1.0 TSI Comfortline) भारतात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच केली आहे. जर्मन ऑटो कंपनीने आज पोलो फॅमिलीमध्ये ही नवीन कम्फर्टलाइन ट्रिम जोडली. नवीन 2021 पोलो कम्फर्टलाइनला बीएस – 6 कंप्लायंट 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड स्ट्रेटिफाइड इंजेक्शन इंजिन दिले गेले आहे, जे फॉक्सवॅगन ग्रुपकडूनच घेतले गेले आहे. (Powerful features at low prices, Volkswagen Polo Comfortline TSI launched in India)
या कारचं इंजिन 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतं. या इंजिनमधून आपल्याला 110 पीएसची शक्ती आणि 175Nm पीक टॉर्क मिळतो. फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले की, “पोलो फॅमिलीमध्ये या नवीन ट्रिमलाईनचा समावेश केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी कम्फर्टलाइन TSI AT सादर केली आहे. पोलो अजूनही या सेगमेंटमधील प्रबळ दावेदार आहे.”
नवीन पोलो व्हेरियंटमध्ये ऑटो क्लायमेट्रॉनिक एअर कंडिशनिंग फीचर देण्यात आले आहे. ही कार 17.7 सेमी Blaupunkt म्युझिक सिस्टमसह येते. नवीन पोलो कम्फर्लाइट TSI AT 5 रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये फ्लॅश रेड, सनसेट रेड, कँडी व्हाइट, रिफ्लेक्स सिल्व्हर आणि कार्बन स्टील या रंगांचा समावेश आहे. कंपनीने या वाहनाचे बुकिंग सुरू केले आहे. कारची किंमत 8.51 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
नवीन पोलो कम्फर्टलाइन टीएसआय व्हेरिएंटमध्ये (Volkswagen Polo Comfortline TSI) जागतिक स्तरावर लाँच केलेल्या व्हेरिएंटमध्ये जेवढा बदल करण्यात आला होता, तितका बदल करण्यात आलेला नाही. कंपनीने अलीकडेच नवीन जनरेशन पोलो हॅचबॅक सादर केली होती, ज्यात बरेच बदल केले गेले आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञान आणि डिझाइनच्या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत.
कंपनीने यावर्षी पोलो हॅचबॅकची मॅट आवृत्ती (एडिशन) लाँच केली होती. फोक्सवॅगन पोलो मॅट एडिशनमध्ये बीएस 6 1.0 लीटरचे थ्री सिलिंडर टर्बोचार्ज्ड TSI इंजिन देण्यात आले होते. मॅटमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. हे इंजिन 108 बीएचपीची पॉवर आणि 175 एनएम टॉर्क देते.
इतर बातम्या
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये Renault Triber पास की नापास?
5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Hyundai ची छोटी SUV बाजारात धुमाकूळ घालणार?
कोरोना काळातही Mahindra च्या ‘या’ कारची घोडदौड सुरुच, बुकिंग्सचे रेकॉर्ड मोडीत
(Powerful features at low prices, Volkswagen Polo Comfortline TSI launched in India)