Pure EV ETRYST 350 : एका चार्जवर 140 किमीची रेंज… प्युअर ईव्हीची ‘ही’ बाईक 1.54 लाखांना लाँच

इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता Pure EV ने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक बाइक नुकतीच बाजारात आणली आहे. कंपनीने ETRYST 350 बाईक बाजारात लाँच केली आहे. या बाईकची एक्सशोरूम किंमत 1.54 लाख रुपये आहे. नवीन इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 85km/h आहे आणि ती एका चार्जवर 140 किमीची रेंज मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Pure EV ETRYST 350 : एका चार्जवर 140 किमीची रेंज… प्युअर ईव्हीची ‘ही’ बाईक 1.54 लाखांना लाँच
ETRYST 350Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:08 PM

भारतातील अग्रणी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी प्युअर ईव्हीने (Pure EV) एक नवीन इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. मेड इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ETRYST 350 बाइक लाँच केली आहे. भारतीय बाजारात ETRYST 350 ची एक्सशोरूम किंमत 1.54 लाख रुपये आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाईकचे (Electric bike) डिझाइन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग (manufacturing) आदी महत्वपूर्ण काम भारतातच पूर्ण झाले आहे. हैदराबाद येथील प्युअर ईव्हीच्या टेक्नोलॉजी आणि डेवलपमेंट सेंटरला करण्यात आली आहेत. Pure EV ची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक बाइक एका चार्जवर 140 किमी प्रवास करू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. लेटेस्ट इलेक्ट्रिक बाईकच्या फीचर्सबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

ETRYST 350 चे स्पेसिफिकेशन्स

Pure EV ETRYST 350 ही हाय टेक्नीक असलेली बाइक आहे. सामान्य भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने या बाईकला तयार केले आहे. Pure EV कंपनीच्या मते, ETRYST 350 बाईक 150cc सेगमेंटमधील पेट्रोल बाईकशी स्पर्धा करण्यासाठी चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल. नवीन इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.5kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा AIS 156 प्रमाणित बॅटरी पॅक आहे.

140 किमी श्रेणी

कंपनीचा दावा आहे, की ETRYST 350 इलेक्ट्रिक बाइक पूर्ण चार्ज केल्यावर 140 किमी अंतर कापू शकते. यासोबतच बाईकचा टॉप स्पीड 85km/h आहे आणि त्यात वापरलेली बॅटरी स्वतः तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ETRYST 350 इलेक्ट्रिक मोटरसायकल हब माउंटेड इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

प्युअर ईव्ही वॉरंटी ऑफर

Pure EV ने इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी पॅकवर खूप लक्ष केंद्रीत केले आहे. ऑटो वेबसाइट ड्राईव्हस्पार्कच्या मते, Pure EV ने असा दावा केला आहे, की त्यांच्याद्वारे निर्मित बॅटरी पॅक प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीतही काम करते. त्याच वेळी, कंपनी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी स्वयं-निर्मित 5 वर्ष / 50,000 किमी वॉरंटी देते. ही ऑफर कंपनीच्या बॅटरी पॅकवरचा आपला विश्वास दर्शविणारी ठरत आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....