टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटा 28 डिसेंबर 2021 रोजी 84 वर्षांचे झाले. रतन टाटा यांचा साधेपणा आणि नम्रता ही त्यांची ओळख आहे. भारतातील सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे. रतन टाटा त्यांच्या राध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र रतन टाटा यांना काही गोष्टींची खूप आवड आहे, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्वात महागड्या वस्तूंबद्दल (Photo Credit : Instagram and Google)
रतन टाटा यांचे घर (Ratan Tata's house) : रतन टाटा यांचे मुंबईच्या कुलाबा भागात 14,000 स्क्वेअर फूट पसरलेले आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये आहे. एखाद्या हवेलीसारख्या या घरात अनेक खोल्या, जिम, स्विमिंग पूल, सन डेक, बार, लाउंज यासह सर्व सुविधा आहेत. (Photo Credit : Google)
2. खासगी जेट (Private Jet) : रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्याकडे दसॉल्ट फाल्कन 2000 (Dassault Falcon 2000) हे प्रायव्हेट जेट देखील आहे. फ्रेंच अभियंत्यांनी बनवलेल्या या जेटची किंमत 30 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 224 कोटी रुपये इतकी आहे. रतन टाटा हे स्वतः प्रशिक्षित पायलट असून ते स्वतः हे विमान उडवतात असे सांगितले जाते. (Photo Credit : Dassault)
3. फेरारी कॅलिफोर्निया (Ferrari California) : रतन टाटा यांना गाड्यांची खूप आवड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी आणि विंटेज कारचा समावेश आहे. रतन टाटा यांच्याकडे टॉप-स्पीड, कन्व्हर्टिबल, लाल फेरारी कॅलिफोर्निया कार देखील आहे, या कारची किंमत 3.45 कोटी रुपये आहे. (Photo Credit : Twitter)
4. मासेराती क्वाट्रोपोर्टे (Maserati Quattroporte) : रतन टाटा यांच्याकडे Maserati Quattroporte ही कार आहे, या कारची किंमत 1.71 - 2.11 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार 4.7 सेकंदात 0-60 किमी प्रतितास इतका वेग गाठते. ही कार आतून बरीच लक्झरी आहे आणि टाटांच्या आवडत्या कारपैकी एक आहे. (Photo Credit : Maserati)
5. मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (Mercedes-Benz S-Class) : 3982 CC V8 पेट्रोल इंजिन असलेली ही आलिशान कार देखील रतन टाटा यांच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 1.57 - 1.62 कोटी आहे. (Photo Credit : Mercedes-Benz)